
नागपुर: कोरोना महामारीचा उद्रेक सद्या कमी झाला असला तरी पूर्णपणे गेलेला नाही, ही महामारी कायमस्वरुपात आटोक्यात यावी व संपूर्ण समाजाला निरोगी जीवन लाभावे या संकल्पनेतून कण्वाश्रम पूजावर्ग महाल, नागपूर येथील भगीनींनी सामुहिक सप्तशती पाठाचे पठण केले.
जयश्री खांडेकर (माई) यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा वर्गाच्या डॉ. मंगला देशपांडे, श्रध्दा महाशब्दे, रोहिणी कोमजवार, साधना नेने, सुनंदा लोथे, आशा चिलमुलवार, परिणीता अरमरकर, मोहिनी डोळे, अश्विनी वाघमारे, वसुधा अरमरकर, गार्गी घनोटे, देवयानी घनोटे व सुजाता काथोरे यांनी सहभाग घेतला.