- नागपुर समाचार, मनपा

रोटरीतर्फे मनपाला ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, बायपॅप मशीन भेट

नागपूर,ता. २४ : कोव्हिडच्या संभाव्य तिस-या लाटेमध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे सक्षमतेने कोरोनावर नियंत्रण आणता यावे व या कार्यामध्ये कुठलीही अडचण येउ नये, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ नागपूरतर्फे मंगळवारी (ता. २४) मनपाला १७ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर व ८ बायपॅप मशीन भेट देण्यात आले.

          नागपूर महानगरपालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त राम जोशी व माजी स्थायी समिती  सभापती  विजय (पिंटू) झलके यांनी ही भेट स्वीकारली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले,  ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर व बायपॅप मशीन मनपासाठी उपयोगी राहणार आहे. त्यांनी यासाठी रोटरी क्लबचे आभार मानले. रोटरी क्लबतर्फे मनपाला पुढेही मदत मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी रोटरीचे माजी गव्हर्नर शब्बीर शाकीर, जुमाना शाकीर, माजी अध्यक्ष आलोक गोयनका, माजी अध्यक्ष संदीप धापोडकर, वर्तमान अध्यक्ष जेरीस्टीन वाचमेकर आणि रोटरी कोषाध्यक्ष मीता शा उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *