
नागपूर, ता.१८ : नागपूर महानगरपालिकेच्या सतरंजीपूरा झोन क्र.७ व्दारे आज पहिल्यांदाच एक वेगळा प्रयोग करुन तपासण्या करण्यात आल्या. झोनचे सहाय्यक आयुक्त श्री.विजय हुमणे व झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी माने यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (१८ मे) रोजी नेहरु पुतळा ते मस्कासाथ चौक इतवारी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या प्रत्येक दुकानात “चाचणी आपल्या व्दारी” या धर्तीवर कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये प्रत्येक दुकानदाराने सहकार्य केले. या सर्व दुकानातील दुकान मालक व येथे कार्यरत सर्व कर्मचा-यांची तपासणी करण्यात आली तसेच रस्त्यावर विना मास्क वावरत असणा-या नागरिकांचीसुध्दा मौक्यावरच चाचणी करण्यात आली. या कार्यवाहीमध्ये एकूण २१७ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. या सर्व चाचणी करण्यात आलेल्या नागरिकांना त्यांची रिपोर्ट फोनवर कळविण्यात येईल. तसेच ज्यांना केलेल्या चाचणी ची प्रत पाहिजे असेल त्यांनी लालगंज चौक येथील दवाखान्यात जाऊन प्रत मिळवून घ्यावी, अशी माहिती श्री. हुमणे यांनी दिली.
सदर कार्यवाहीमध्ये श्री.सचिन मेश्राम, श्री. राकेश सहारे, श्री.विजय रामटेके, श्री. अमित पाटील, श्री. विप्लव धवणे, श्री. नरेंद्र जांभुळकर, श्री.नकिब खान, श्री. रमेश तांबे, परिचारिका व डॉक्टर यांनी सहकार्य केले.