- मनपा

मंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोधपथकाची कारवाई  

नागपूर, ता.१८ :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. १८ मे)रोजी २८ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २,२५,००० चा दंड वसूल केला. पथकाने तीन झोनमध्ये ९ दुकाने सील करण्याची कारवाई केली. गांधीबाग झोन अंतर्गत प्रेसीडेंट वाईन शॉप, किला रोड, कमाल रेडीमेड, मोमिनपुरा, पिंटु सावजी जुनी मंगलवारी आणि भव्य साडी, नंगापुतला चौक यांना गांधीबाग झोनच्या सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले. सतरंजीपूरा झोन अंतर्गत शहीद चौक इतवारी मधील जैन होजेरी स्टोअर्स, चंदन गारमेन्ट व वामन थ्रेडस फॅक्टरी शांतीनगर तसेच मंगळवारी झोन मधील पुनम चेंबर छावणी येथील मॅक डोनल्ड रेस्टॉरेन्ट आणि अंजुमन कॉम्प्लेक्स सदर येथील बेल्जीयम वाफले दुकानाला मंगळवारी झोनच्या सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले. पथकाने ४८ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *