- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपुर : मास्क न लावणा-या १३० नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (११ डिसेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १३० नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ६५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी २३४६८ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,००,९३,०००/- चा दंड वसूल केला आहे.

शुक्रवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ११, धरमपेठ झोन अंतर्गत २२, हनुमाननगर झोन अंतर्गत २५ धंतोली झोन अंतर्गत १२, नेहरुनगर झोन अंतर्गत ७, गांधीबाग झोन अंतर्गत ९, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ७, लकडगंज झोन अंतर्गत ९, आशीनगर झोन अंतर्गत १२, मंगळवारी झोन अंतर्गत १३ आणि मनपा मुख्यालयातील ३ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत १७९९८ बेजबाबदार नागरिकांकडून रु ८९ लक्ष ९९ हजार वसूल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *