- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : महिला गटात मुंबई उपनगर व पुरुष गटात मुंबई शहर संघाची अंतिम फेरीत धडक

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रितेश देशमुख यांची उपस्थिती

नागपूर समाचार : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत महिला गटात पुणे जिल्हा विरुद्ध मुंबई उपनगर यांची उपांत्य लढत झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात मुंबई उपनगरने पुणे जिल्ह्यावर 24-22 अशा गुणांनी मात केली व अंतिम फेरीत धडक मारली. पुणे कडून मानसी रोडे तर मुंबई उपनगर मधून याशिका पुजारी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. 

पुरुष गटात मुंबई शहर विरुद्ध अहिल्यानगर यांच्यात उपांत्य लढत झाली. यात मुंबई शहर ने अहिल्यानगर संघाचा 30-26 गुणांनी पराभव करून मुंबई शहर ने अंतिम फेरीत धडक मारली. मुंबई संघाकडून सुशांत साहिल व ओंकार राणे यांनी तर अहिल्या नगर संघाकडून सौरभ राऊत व अजित पवार यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, नागपूर विभाग, अॅमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ आणि नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेचा आज, सोमवार ४ मे रोजी, उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात समारोप झाला.

कोराडी (ता. कामठी) येथील सेवानंद विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या भव्य सोहळ्याला 🎬 रितेश देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, महापौर नीता ठाकरे, माजी खासदार नवनीत राणा, अभिनेत्री मेघा धाडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमादरम्यान रितेश देशमुख यांचा पुष्पहार व गदा देऊन सत्कार करण्यात आला. अभिनेत्री मेघा धाडे यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन केले. 

स्पर्धेच्या अंतिम सामन्यांनी उत्कंठा शिगेला पोहोचवली. राज्यभरातून सहभागी झालेल्या ३२ संघांनी (१६ पुरुष व १६ महिला) उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेचा दर्जा उंचावला. 

समारोप सोहळ्यात विजेते व उपविजेते संघांना चषक, पदके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

नेत्रदीपक ड्रोन शो आणि शिवाजी महाराजांवरील स्किट हे विशेष आकर्षण ठरले.

तीन वर्षांच्या देवश्री रुद्रकर ने बाल शिवाजीच्या वेशात प्रभावी सादरीकरण केले. रितेश देशमुख यांनी तिचे विशेष कौतुक केले. 

 “छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आदर्श” – रितेश देशमुख