- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागरिकांच्या समस्या सोडवण्या संदर्भात तसेच विकासकामा संदर्भात नितीन गडकरी यांची आढावा बैठक

नागपूर समाचार : नागपूरमधील विकासकामे व शहरातील नागरिकांच्या समस्या यांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी आज नागपूर महानगरपालिका दालनात राज्याचे मंत्री व नागपूरचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे जी, महानगरपालिकेचे आयुक्त श्री डॉ. अभिजीत चौधरी जी, नागपूरचे जिल्हाधिकारी श्री डॉ. विपीन इटनकर जी, नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष श्री संजय मीणा जी, लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. 

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात तसेच विकासकामांसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने नागपूर शहरातील मार्केटची सद्यस्थिती, नागपूर शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे सादर करणे, नागपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापन व प्रोसेसिंगची सद्यस्थिती, शहरातील शुक्रवार तलाव, लेंडी तलाव, नाईक तलाव यांच्या कामाची सद्यस्थिती, शहरातील पाण्याची व्यवस्था मनपा हद्दीतील १० झोनप्रमाणे करण्याच्या मागणी, मौजा कळमना येथील किराणा मर्चंट असोसिएशनला देण्यात आलेल्या जागेवर प्रकल्प बांधकाम तसेच एन्व्हायर्नमेंट क्लिअरंस साठी मुदतवाढ देणे, नागपूर शहरातील कल्याणेश्वर मंदिराबाबतचा प्रस्ताव, जिल्ह्यातील स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाची सद्यस्थिती, शहरातील यशवंत स्टेडियम तसेच सोक्ता भवन कामाची सद्यस्थिती, बाबूळपेठ-उत्तर नागपूर येथे विज्ञान केंद्र स्थापना, नागपूर शहरातील सिमेंट रस्ते टप्पा-५ साठी निधी उपलब्ध करण्याकरिता शासनास प्रस्ताव सादर करणे या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. 

त्याचप्रमाणे शहरातील अग्निशमन व्यवस्थेसाठी पदनिर्मिती व नवीन मशीन विकत घेणे, २०२४मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील विविध भागांत आलेले पुराचे पाणी, त्यासाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी व त्याअनुषंगाने सुरू असलेल्या कामाची सद्यस्थिती तसेच उपाययोजना, शहरातील टीबी वॉर्डलगत असलेल्या समेकित कौशल विकास पुनर्वास एवं दिव्यांगजन सशक्तिकरण केंद्रास नियमानुसार लावण्यात आलेला मालमत्ता कर व सेवा शुल्क माफ करणे, पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई, आयआरडीपी अंतर्गत नाले सफाई, वसाहतीतील पावसाळी नाल्यांची सफाई व सर्व गडर लाईनची सफाई, त्याचप्रमाणे रस्त्यावरील वृक्षांच्या फांद्या तोडण्यासंदर्भात उपाययोजना, नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत शहरातील विविध अभिन्यासातील भुखंडांचे आरएल प्रलंबित असल्यामुळे त्यांच्या नियमितीकरणासाठी उपाययोजना या विषयांवर देखील सखोल चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *