डॉ. राजेंद्र साठे यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड
नागपूर समाचार : आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यू) ३ रे नागपूर जिल्हा अधिवेशन गुरुदेव सेवाश्रम येथे रविवारी मोठ्या थाटात पार पडले. अधिवेशनाला प्रामुख्याने महाराष्ट्र आशिया गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा कॉ.आनंदी अवघडे उपस्थित होत्या. राज्याध्यक्ष यांच्या हस्ते झेंडा वंदन करून शहिदांना श्रद्धांजली वाहून अधिवेशनाचे उद्घाटन केले.
अधिवेशनाला प्रामुख्याने नांदेडच्या डॉ. उज्वला पडलवार यांना क्रांतिवीर नाना पाटील पुरस्कार राज्य शासनातर्फे देण्यात आल्यामुळे त्यांना निमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याकरता नागपूरचे पूर्व पालकमंत्री सुनील केदार, कस टाईप महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण गाडे, आदिवासी विद्यार्थी विकास महासंगाचे शंभूगोंड कोहचाडे, प्रसिद्ध गायक अनिरुद्ध शेवाळे यांनी सुंदर गीत गाऊन तिसऱ्या जिल्हा अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या.
राज्य अध्यक्ष आनंदी उघडे यांनी अधिवेशनाचे उद्घाटन करत आशा व गटप्रतिक यांना मार्गदर्शन करताना संघटन वाढ व आपल्या हक्काकरता लढण्याकरता सक्षम होण्यासाठी विशेष बाबी सांगितल्या. काँ. डॉ. उज्वला पडलवार यांनी सत्कार स्वीकारताना आपल्या तेजस्वी वाणीने नागपूर जिल्ह्याचे आभार मानत त्यांनी सांगितले की नागपूर मध्ये माझ्या करण्यात आलेला सत्कार माझ्या जीवनात नेहमी करता एक मोठी आठवण राहील सत्काराची प्रमुख भागीदार मी नसून राज्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक आहेत असे त्यांनी बोलताना सांगितले.
जिल्हा महासचिव कॉ. प्रीती मेश्राम यांनी तीन वर्षाच्या कालखंडात संघटनेचे कामकाज उपलब्धी व भविष्यात करण्यात येणारे लढे यावर महासचिवांचा अहवाल मांडला. जिल्हा कोषाध्यक्ष कॉ. लक्ष्मी कोत्तेजवार यांनी तीन वर्षाच्या आवक जायक याच्या हिशेब मांडला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर कॉ.रंजना पौनीकर यांनी ठराव मांडून माया कावडे यांनी अनुमोदन केले.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा, ग्रॅज्युटी व पेन्शन याच्या ठराव संगीता मेश्राम यांनी मांडून अनुमोदन अर्चना कोल्हे यांनी केले. महिला उत्पिडन व अत्याचार यावर ठराव प्रतिमा डोंगरे यांनी मांडून सरिता ठवरे यांनी अनुमोदन केले. महाराष्ट्र राज्य सुरक्षा कायदा विरोधी ठराव सरला मस्के (गट) यांनी मांडून उज्वला कांबळे यांनी अनुमोदन केले. नवीन कामगार कायदे रद्द करा हा ठराव सुकेशींनी उमरेडकर यांनी मांडून गीता मेश्राम यांनी अनुमोदन केले.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हाध्यक्ष कॉ. कॉम्रेड राजेंद्र साठे यांनी करून शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा, २६ हजार रु. किमान वेतन, रिटायरमेंट नंतर ५ लाख रुपये ग्रॅज्युटी, १० हजार रुपये महिना मासिक पेन्शन, वर्षाच्या १५ दिवस सुटी, प्रसूती रजा, जे एस वाय अंतर्गत ए पी एल / बी पी एल अट रद्द करणे यावर पुढील लढा लढन्याकरता आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी सज्ज व सतर्क रहावे. असे आवाहन नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष काँ. राजेंद्र साठे यांनी केले.
कार्यक्रमाला आनंदी अवघडे, उज्वला पडलवार, राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, लक्ष्मी कोत्तेजवार, माया कावळे, रंजना पौनीकर, उज्वला कांबळे, प्रतिमा डोंगरे, मंदा गंधारे, सरिता धोटे, सरला मस्के, संगीता मेश्राम, सरिता ठवरे सह. शेकडो आशा वर्कर व गटप्रवर्तक उपस्थित होते.