- Breaking News, नागपुर समाचार

कामठी समाचार : सोमवार 27 नोव्हेंबर ला ड्रॅगन पॅलेसच्या स्थापना दिनी अप्रतिम ‘फूड कोर्ट’चे उद्घाटन

कामठी समाचार : कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर 27 नोव्हेंबर सोमवार ला विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस परिसरात 15 हजार स्कवेअर फिट असलेल्या भव्य दिव्य असलेल्या अप्रतिम ‘फूड कोर्ट ‘चे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते 27 नोव्हेंबर ला दुपारी 2 वाजता होणार आहे.याप्रसंगी केंद्रिय रस्ते व वाहतूक व सडक परिवहन मंत्री ना नितीन गडकरी , महाराष्ट् राज्याचे वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार, माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे तसेच जपान हुन आलेले पुज्यनिय भिक्खू संघाची उपस्थिती राहणार आहे.

ड्रॅगन पॅलेस परिसरात 15 हजार स्केअर फूट परिसरात उभारण्यात आलेले ‘फूड कोर्ट’हे राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अर्थसहाय्यातून निर्मिती करण्यात आली असून या फूड कोर्ट चे अप्रतिम आर्किटेक्चर डिझाईन सुप्रसिद्ध आर्किटिस्ट हबीब खान यांनी केले असून स्ट्रक्चरल डिझाईन दिलीप मसे यांनी केले आहे.

या फूड कोर्टच्या बांधकामकरिता दिवसरात्र अहोरात्र मेहनत घेण्यात आली असून 15 हुन अधिक एजन्सी ने आपले योगदान दिले आहे.या फूड कोर्ट च्या माध्यमातुन विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देणाऱ्या लाखो भाविकांना विविध व्यंजनाचा आस्वाद घेता येईल.तेव्हा ड्रॅगन पॅलेस स्थापणा दिनानिमित्त आयोजित ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल व फूड कोर्ट च्या उदघाटन कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येत नागरिकांनी सहभाग दर्शवावा असे आवाहन ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *