- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

कामठी समाचार : 24 व्या वर्धापन दिनासाठी ड्रॅगन पॅलेस टेम्पल सुसज्ज

स्लग:-27 नोव्हेंबर ला आयोजित विशेष बुद्ध वंदनेच्या पूर्वसंध्येवर तथागत भगवान बुद्धांच्या चंदनाच्या मूर्तीचे नवीनीकरण

कामठी समाचार  : येत्या सोमवारी 27 नोव्हेंबर ला कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 24 वा वर्धापन दीन असून या वर्धापन दिनानिमित्त 27 व 28 नोव्हेंबर ला दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. 27 नोव्हेंबर ला ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी 10 वाजता जपान येथील भिख्खू संघाच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना होणार आहे. या वर्धापन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात सुशोभीतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून आयोजित विशेष बुद्ध वंदनाच्या पूर्वसंध्येवर ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील सहा फूट उंच असणारी व 864 किलोग्राम वजनाची चंदनाची तथागत गौतम बुद्धांची मूर्तीच्या नविनिकरण करण्याचे काम सुद्धा युद्धपातळीवर सुरू असून हे नविनिकरण जपान येथील प्रसिद्ध मूर्तिकार हराडा हिरोयिकी यांच्या हस्ते होत आहे. ही अप्रतिम बुद्धमूर्ती अखंड चंदनाच्या लाकडापासून बनविण्यात आली असून 6 फूट उंच व 864 किलो वजनाची आहे.या मूर्तीचे सुंदर डोळे अर्धान्मीलित आहेत.

उल्लेखनीय आहे की,कामठी येथील कर्मवीर दादासाहेब कुंभारे परिसराच्या 10 एकर जागेवर विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ची निर्मिती कार्तिक पोर्णिमेच्या पावन पर्वावर सन 1999 मध्ये साकारण्यात आले असून या विहाराच्या निर्मितीसाठी अत्यंत उच्च दर्जाचे बांधकाम साहित्य वापरले आहे.शेकडो कुशल कामगारांच्या अथक प्रयत्नातून ही वास्तू साकारली आहे राजस्थान येथील संगमरवर,आग्रा येथील लाल दगड,दक्षिण भारतातून कुशल तंत्रज्ञानाकडून तयार केलेले ग्रॅनाईटचे कठडे आपले वेगवेगळे वैशिष्ट्य दर्शवितात.

प्लास्टर न करता वापरण्यात आलेले कांक्रीट येथील उच्च दर्जाच्या बांधकामाची साक्ष देत.पर्यावरणाच्या आवश्यकतेनुसार छताला लक्ष वेधून घेणाऱ्या निळ्या रंगाच्या इटालियन काचा वापरण्यात आले आहेत. विहारातील मंच अत्यंत शुभ्र सगमरवरापासून साकारण्यात आला आहे. तंत्रशुद्ध ध्वनोक्षेपण व्यवस्था व प्रकाशयोजना करण्यात आली आहे. या परिसरात नयनरम्य बगीचा हिरवळीचे गलीचे व रंगीबेरंगी कारंजे या ड्रॅगन पॅलेस टेम्पल ची शोभा द्विगुणित करतात. 

ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या वर्धापन दिनानिमित्त 27 व 28 नोव्हेंबर ला दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा या कार्यक्रमात अधिकाधिक संख्येत नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *