- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर : अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या राज्यसरकारचा जाहीर निषेध

अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या राज्यसरकारचा जाहीर निषेध

नागपूर : आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगराद्वारे भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे व शहर अध्यक्ष पारेंद्र पटले यांच्या नेत्रृत्वात राज्य सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. अभियाक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चा समित ठक्कर याच्या वाक्तव्याचे समर्थन करत नाही. तो दोषी आहे की नाही हे न्यायालयाचं ठरवेल. पण ज्या प्रकारची वागणूक त्याला राज्य सरकारतर्फे देण्यात आली ही अतिशय निंदनीय आहे. त्याला न्यायालयात अतिरेख्यासारखे पकडून नेण्यात आले. हे अतिशय चुकीचे आहे आणि कदापि सहन केले जाणार नाही.

आज युवा मोर्चाने पेंग्विनची प्रतिकृती गळ्यात घालून निदर्शने केली. शेकडो युवा मोर्चाचे कार्यकर्ते यावेळी पेंग्विनची प्रतिकृती घालून होते. कारण की बेबी पेंग्विन म्हंटल्यावर जर कोणाला राग येतोय तर याच्या अगोदर बऱ्याच लोकांनी बऱ्याच गोष्टी म्हंटल्या आहेत पण तेव्हा त्यांचे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य होते आणि तेच जर का दुसरे कुणी व्यक्त करतो आणि स्वतःवर गोष्टी येत आहेत तर वेगळे नियम लावता वेगळे निकष लावता हे की अतिशय चुकीचे आहे, सत्तेचे दुरुपयोग ह्या राज्य सरकारने करू नये, राज्य सरकारने सत्तेचा माज आला आहे, हा माज आणि सत्तेचा दूर- उपयोग केवळ महाराष्ट्राचीच नाही तर देशाची जनता बघते आहे. आणि योग्य वेळ आल्यावर त्याचे उत्तर आपणाला मिळेलच.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल खंगार, कमलेश पांडे, योगी पाचपोर, दीपांशु लिगायत, अलोक पांडे, सचिन करारे, वैभव चौधरी, नेहल खानोरकर, हर्षल तिजारे, बबलू बकसारिया, पुष्कर पोरशेट्टीवार, अमर धरमारे, पियुष बोईनवार, राकेश भोयर, रितेश रहाटे,आशिष पांडे, यश सातपुते, प्रसाद मुजुमदार, आरती पांडे, राकेश पटले, अंकुर थेरे, मनमीत पिल्लारे, संकेत कुकडे, क्रितेश दुबे, मनीष गंगवाणी, शौनक जहागीरदार, आशुतोष भगत, अक्षय दाणी, आकाश भेदे, विजय मोघे, मोहित भिवनकर, गुड्डू पांडे, एजाज शेख, शैलेश नेताम, शंकर विश्वकर्मा, असिफ पठाण, समीर मांडले, पवन खंडेलवाल, अथर्व त्रिवेदी, बबलू बकसारिया, पुष्कर पोरशेट्टीवार, रोहित त्रिवेदी, ईशान जैन, सागर घाटोळे, अक्षय शर्मा संदीपान शुक्ला, अनिकेत ढोले, सोनू डकाहा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *