- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

नागपूर समाचार : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकरी विचार मोर्चा आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा च्यावतीने आज कास्टाईब कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैशाली तभाने यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना तभाने बोलले आता आंबेडकरी विचार मोर्चा महिलांच्या सन्मान आणि त्यांच्या आर्थिक विकासासाठी मैदानात उतरले आहे महिलांच्या आर्थिक विकास हेच आमचे ध्येय आहे असे ते अध्यक्ष स्थानावरून बोलत या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष नामदेवराव निकोसे यांनी महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला आदिवासी महिला नेत्या संजीवनी कुमरे यांनी जयपाल सिंग मुंडा यांच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा के.एस. पानतावणे यांनी केले आदिवासी नेते भाऊसाहेब खुरसंगे यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमात सुषमा नागरे,मंदा वैद्य, आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *