- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपुर समाचार : पंतप्रधानांच्या संकल्पनेतील ‘व्होकल फॉर लोकल एक्स्पो’; नागपुरात ६ ते ८ जानेवारी दरम्यान

श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचा पुढाकार : अनूप जलोटा, अजित परब आणि विष्णू मनोहर यांचे विशेष ‘शो’

नागपूर समाचार : मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील ‘व्होकल फॉर लोकल एक्स्पो’ चे नागपुरात आयोजन करण्यात येत आहे. श्री. सिद्धिविनायक ट्रस्ट झिल्पीद्वारे ६, ७ आणि ८ जानेवारी २०२३ रोजी पूर्व लक्ष्मीनगर येथील व्हॉलिबॉल मैदानात हे एक्स्पो आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ‘व्होकल फॉर लोकल एक्स्पो’ चे उदघाटन होईल. उदघाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून माहिती आयुक्त श्री. राहुल पांडे, पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची उपस्थिती असेल.

तीनही दिवस दुपारी १२ ते रात्री १० वाजता पर्यंत नियमित हे एक्स्पो सुरू राहिल. विशेष म्हणजे, एक्स्पोमध्ये सुप्रसिद्ध भजन गायक श्री. अनूप जलोटा, सुप्रसिद्ध गायक श्री. अजित परब आणि विक्रमवीर श्री. विष्णू मनोहर यांचे स्पेशल शो असणार आहेत.

पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी स्थानिक रोजगार आणि उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि विदेशात या उत्पादनांचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या उद्देशाने ‘व्होकल फॉर लोकल’ ही संकल्पना मांडली. मा. पंतप्रधानांच्या या संकल्पनेत आपले छोटेशे योगदान म्हणून आणि नागपूर शहरात स्थानिक स्तरावर येथील महिला, तरुण यांच्या स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळावे, तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावे, या हेतून ‘व्होकल फॉर लोकल एक्स्पो’ चे आयोजन करण्यात येत आहे.

एक्स्पोमध्ये पूर्व लक्ष्मीनगर येथील व्हॉलिबॉल मैदानात शुक्रवारी ६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध भजन गायक श्री. अनूप जलोटा यांची भजन संध्या, शनिवार ७ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘हिच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे..’ फेक सुप्रसिद्ध गायक श्री. अजित परब यांची भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. तर रविवारी ८ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता ख्यातनाम शेफ विक्रमवीर श्री. विष्णू मनोहर यांच्या कुकरी शो चे आयोजन आहे.

याशिवाय ‘व्होकल फॉर लोकल एक्स्पो’ मध्ये ‘फॅशन अँड लाईफस्टाईल’, ज्वेलरी, हस्तकला आणि हस्त निर्मिती दागिने, सर्व प्रकारची सेंद्रीय उत्पादने, नर्सरी अँड अॅग्रो, स्कील डेव्हलपमेंट अँड ट्यूटोरियल, टूर्स अँड ट्रॅव्हल्स/रिअल इस्टेट, बँकींग अँड म्यूचल फंड, अन्नपदार्थ अनेक विविध स्टॉल्स असणार आहे. विशेष म्हणजे, या एक्स्पो ला भेट देणाऱ्यांसाठी दररोज लकी ड्रॉ काढले जाणार आहे. या लकी ड्रॉ च्या माध्यमातून एक्स्पोला भेट देणाऱ्यांना आकर्षक बक्षीसे सुद्धा जिंकता येणार आहेत. एक्स्पोला समस्त नागपूरकरांनी अवश्य भेट द्यावी आणि आनंद लुटावा ही विनंती संदीप जोशी यांनी पत्राकार परिषद मध्ये केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *