- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागरिकांनो, ध्वजदिन निधी संकलनास सढळ हाताने मदत करा – जिल्हाधिकारी डॉ‌. विपीन इटनकर

नागपूर समाचार : देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत सैनिकांच्या कल्याणासाठी असलेल्या ध्वजदिन निधी संकलन कार्यात शासकीय कार्यालयासह दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, कंपन्या आदींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत उस्फूर्तपणे योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे.

देशाच्या प्रती सैनिकांचे बलिदान ही खुप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव सर्व नागरिकांना असणे गरजेचे आहे. ध्वजदिन निधी हा माजी सैनिक, विरपत्नी, विरमाता व त्यांचे वारस, माजी सैनिकांचे पाल्य यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व कल्याणासाठी खर्च होत असल्याने दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही जास्त निधी संकलन करण्यात यावा. ध्वजदिन निधीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदत करण्याचे आवाहनही डॉ. इटनकर यांनी केले आहे.

2 लाख 50 हजाराचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द

भारतीय सैन्यातील बहादूर योध्दयाच्या प्रती सन्मान व कृतज्ञता व्यक्त करून बँक ऑफ इंडियाच्या वतीने आर्थिक मदतीचा 2 लाख 50 हजाराचा ध्वजदिन संकलन निधीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना सुपूर्द करण्यात आला.

बॅक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक जय नारायण, उपप्रादेशिक व्यवस्थापक ग्यान रंजन दास, व्यवस्थापक मेजर सुमित, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॅा. शिल्पा खरपकर सहाय्यक प्रादेशिक व्यवस्थापक आनंद सक्सेना, संजय कदम, रवी कुमार, युनियनचे अधिकारी महेंद्रा ढोनसे, सुरेश बोभाटे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मोहित गेडाम यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *