१९७६ च्या दहावीच्या बॅचचे सुवर्णमहोत्सवी स्नेहमीलन उत्साहात साजरे
नागपूर समाचार : श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय, महाल, नागपूर येथील १९७६ च्या दहावी उत्तीर्ण बॅचचा सुवर्णमहोत्सवी स्नेहमिलन सोहळा शाळेच्या मध्यवर्ती सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 99 वर्षीय माजी शिक्षक प्रभाकर डोंगरे सर, रामचंद्र जामकर सर, रमेश शुक्ला सर, जयश्री हुद्दार मॅडम, सुधाकर मंगळगिरी सर, प्रकाश सेनाड सरांचा यावेळी हृद्य सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यात सुमारे ३० माजी विद्यार्थी – विद्यार्थीनी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची संकल्पना दिलीप अंजीकर यांची होती. माजी विद्यार्थ्यांनी गतकाळातील आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. कल्पना पाठक यांनी केले, तर आभार प्रदर्शन गिरीश सुभेदार यांनी केले. शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापिका माधुरी यावलकर व पर्यवेक्षिका सन्या पंचभाई यांचे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य लाभले. तसेच, सतीश पांढरे, देवेंद्र चवरे, राम चांदे, प्रदीप अलोणी आणि अॅड. कल्पना पाठक यांनी विशेष परीश्रम घेतले.




