- Breaking News

हिंगणघाट समाचार : हिंगणघाट शहरातील आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात महामानव विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

आ. कुणावार यांचेसह मान्यवरांनी केले महामानवाचे जयंतीदिनी स्मृतीस अभिवादन

हिंगणघाट समाचार : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, वंचितांच्या हक्कासाठी आयुष्य वेचणारे शिक्षण, संघटन तसेच संघर्ष यांचा मंत्र देणारे, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज दि.१४ रोजी आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी डॉ बाबासाहेब यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत उपस्थितांचेवतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला आमदार समीर कुणावार यांचेसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी जि.प.सदस्य, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल बाडे, नगरपरिषद गट नेता भूषण पिसे, नगरपरिषद बांधकाम सभापती चंदू माळवे, नगरसेवक धनंजय बकाने, नगरसेवक विक्रांत भगत, नगरसेवक रवींद्र रोहनकर, तसेच समाजसेवक समीर धारकर, सुबोध मांडवे, पांडुरंग बालपांडे, माजी नगरसेवक अमन काळे, संजय मगर, राजू माडेवार, डॉ. मंदार मराठे इत्यादी मान्यवरांसह असंख्य कार्यकर्ता उपरोक्त कार्यक्रमाला उपस्थित होते.