- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ‘शालांत परीक्षा’ आंदोलनाला विविध संघटनांचा सक्रीय पाठिंबा

‘शालांत परीक्षा’ आंदोलनाला विविध संघटनांचा सक्रीय पाठिंबा

नागपूर समाचार : जोपर्यंत शिक्षण संस्‍थांना वेतनेत्‍तर अनुदान मिळत नाही तोपर्यंत दहावी व बारावीच्‍या शालांत परीक्षांसाठी शाळा इमारती व इतर सुविधा उपलब्‍ध न देण्‍यात येणार नाही, असा पवित्रा घेत महाराष्‍ट्र राज्‍य शिक्षण संस्‍था महामंडळाने आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना व मुख्‍याध्‍यापक संघाने सक्रीय पाठिंबा जाहीर केला आहे.

मंगळवारी नागपूर जिल्‍हा समन्‍वयक समितीची बैठक श्रीमती दादीबाई देशमुख हिंदु मुलींचा शाळा, महाल येथे घेण्‍यात आली. शिक्षक आमदार नागो गाणार यांच्‍या अध्‍यक्षतेत झालेल्‍या या सभेला महाराष्‍ट्र राज्‍य शिक्षण संस्‍था महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी संबोधित केले. शाळांची सद्यस्थिती, महामंडळाच्‍या मागण्‍या, सरकारकडून चालू असलेली टोलवाटोलवी अशा अनेक मुद्दयांवर प्रकाश टाकला.  

या सभेला महाराष्‍ट्र माध्‍यमिक शिक्षक महासंघाचे पुरुषोत्‍तम पंचभाई, बाळा आगलावे, विजुक्‍टा नागपूरचे महासचिव डॉ. अशोक गव्‍हाणकर, शिक्षक भारतीचे राज्‍य उपाध्‍यक्ष प्रा. राजेंद्र झाडे, संयुक्‍त कार्यवाह प्रा. दिलीप तडस, विभागीय कार्यवाह प्रा. सपन नेहरोत्रा, विदर्भ माध्‍यतिक शिक्षक महासंघाचे जिल्‍हा अध्‍यक्ष अनिल गोतमारे, भाजपा शिक्षक आघाडी नागपूरचे प्रदीप बिबटे, भुषण तल्‍हार यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, मुख्‍याध्‍यापक संघटनांनी महामंडळाच्‍या आंदोलनाला यावेळी सक्रीय पाठिंबा जाहीर केला.

Leave a Reply

Your email address will not be published.