- नागपुर समाचार

गंगा जमुनाच्या मुद्द्यावर आ.कृष्णा खोपडे, विकास कुंभारे यांची पोलीस आयुक्तांना भेट.

नागपुर: गंगा जमुना हटविण्याच्या मुद्द्यावर आज आ.कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, पोलीस आयुक्त यांना भेटले व गंगा जमना येथील प्रत्येक घराची झडती घ्या. अनेक तळघरे सापडतील. बंदोबस्त कमी झाल्यामुळे पुन्हा वेश्याव्यवसाय पूर्वीप्रमाणे सुरु झालेला आहे. त्यावर आळा घालणे आवश्यक. मा.उच्च न्यायालयाचे आदेशानुसार राहण्यास मनाई नाही तर व्यवसाय करता येणार नाही, या आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी झाली पाहिजे. अल्पवयीन मुलींवर होत असलेले अत्याचार थांबवा. परिसरात असलेल्या अवैध बांधकामावर कारवाई झाली पाहिजे व अशा अनेक मागण्यांचे निवेदनासह पोलीस आयुक्त यांची भेट घेतली. पोलीस आयुक्त यांचेसोबत सकारात्मकसविस्तर चर्चा झाली व सकारात्मक प्रतिसाद आयुक्त महोदयांनी यावेळी दिला. 

यावेळी नगरसेवक मनोज चापले, माजी नगरसेवक राजू धकाते, श्याम चौधरी व धनराज मेंढेकर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *