- मनपा

नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजे एनटी) आरक्षणासाठी घटित केलेल्या समर्पित आयोगाची बैठक नागपूरात 28 मे रोजी

नागपूर, ता. 18 : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजे एनटी) आरक्षण देण्यासाठी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग घटित केला आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणा-या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी मा.समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहिर केला आहे. शनिवार दिनांक 28 मे, 2022 रोजी सायंकाळी 4.30 ते 6.30 या कालावधीत विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे भेटीचा कार्यक्रम आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर व जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे आपल्या नावाची नोंदणी दिनांक 27.05.2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत भेटीच्या दिनांकापूर्वी करण्यात यावी. याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घेण्यात यावी असे आवाहन मनपा आयुक्त आणि प्रशासक श्री. राधाकृष्णन बी यांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.