
नागपूर : बेळगाव वासियांनी भा.ज.प. ला बहुमत दिले, मात्र शिवसेनेचा नुसता पराभवच नाही तर संपूर्णपाने हद्दपार करण्याचे काम बेळगाव वासियांनी केले आहे. जनमताचा विश्वास घात करणारी शिवसेना आता रसातळाच्या मार्गावर लागलेली आहे. येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईकर सुद्धा शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी सज्ज आहे. मुंबईच नव्हे तर नागपूर, नाशिक, ठाणे सह अनेक म.न.पा. निवडणुकीत सेनेला त्यांची जागा दाखविण्याचे काम मतदार बंधू-भगिनी निश्चितपणे करणार असल्याचे आमदार कृष्णा खोपडे म्हणाले.
आघाडीसोबत शिवसेनेचे संबंध अनैतिक
आमदार कृष्णा खोपडे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर मते घेतली. राज्यातील जनतेनी आघाडीला नव्हे तर युतीलाच भरभरून मतदान दिले. मात्र सत्तेच्या लालसापोटी वडिलांचे आदर्श बाजूला सारून, हिंदुत्वाची विचारधारा खुंटीला टांगून उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत अनैतिक संबंध जोडले. म्हणजे लग्न एकासोबत केले व संबंध एकासोबत. यात नैतिकता कुठे आहे? मग याला अनैतिक संबंध म्हटल्यास वावगे काय?
पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला झटका देणा-या याच जनतेने आता शिवसेनेला बेळगांवमध्ये भोपळा दिला. आघाडीसोबत जोडलेल्या अनैतिक संबंधातून शिवसेनेला खुर्ची मिळाली खरी, मात्र आता पराभवाचे हादरे सोसण्यासाठी तयार रहा. कारण हीच जनता आता तुम्हाला खुर्चीवरून खाली ओढण्यासाठी सज्ज झालेली आहे.
राऊतसाहेब पोपटपंची बंद करा, साहेबांना मोलाचा सल्ला द्या
काही लहान घडो व मोठे बोलका पोपट मात्र तयारच असतो. मेरी मुर्गी की एक टांग अशाप्रकारचे वक्तव्य करण्यास संजय राऊत प्रसिद्ध आहेत. राजकारणातील जोकर म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. सरकारचे एकामागून एक मंत्री कुणी बाईसाठी तर कुणी पैशासाठी प्रसिद्धी मिळवीत आहेत. असेच सुरु राहिले तर एक दिवस राज्याचे मंत्रिमंडळ रिकामे झाल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेबांच्या शिवसेनेला वाचवायचे असेल तर पोपटपंची बंद करा व उद्धवसाहेबांना मोलाचा सल्ला द्या. अन्यथा जनता तयार आहेतच. राज्यातील जनतेने केलेल्या उपकाराची परतफेड करण्याऐवजी त्यांचा विश्वासघात कराल तर लक्षात ठेवा. संपूर्ण महाराष्ट्राचे बेळगाव झाल्याशिवाय राहणार नाही.
उक्त प्रतिक्रिया पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली.