- नागपुर समाचार

नागपूरमधील गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरण कामाचे भूमीपूजन

केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी नागपूरमधील गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरण कामाचे विरोधी पक्षनेते श्री Devendra Fadnavis, माजी मंत्री श्री Chandrashekhar Bawankule, महापौर श्री दयाशंकर तिवारी, भाजप शहराध्यक्ष श्री Pravin Datke, खासदार Dr. Vikas Mahatme यांच्या उपस्थितीत भूमीपूजन केले.

गांधीसागर तलावातील ड्रेनेज लाईन्स बंद करून तलावातील गाळ काढावा व ती खतयुक्त माती शेतकऱ्यांना शेतीसाठी द्यावी, जेणेकरून तलावाची पाणी पातळी वाढेल व शेतकऱ्यांनाही फायदा होईल, अशा सूचना या वेळी गडकरीजी यांनी केल्या.

याशिवाय पीपीपीच्या माध्यमातून पाण्यावर उतरणारे छोटे विमान, पाण्यावर तरंगते रेस्टॉरंट अशा कल्पना मांडत त्याविषयी विचार केला जावा असेही ते म्हणाले. शहरातील रस्त्यांच्या विकासाबरोबरच नागपूर शहर ध्वनी, जल, वायू प्रदुषण मुक्त होण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न केले पाहिजेत, असे श्री गडकरीजी या वेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *