- Breaking News, नागपुर समाचार, नियुक्ती

नागपूर समाचार : प्रशंसा भोयर यांची भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगर ‘युवती प्रमुख’ पदी निवड

नागपूर समाचार : भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगरच्या ‘युवती प्रमुख’ पदी कु. प्रशंसा भोयर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष मा. दयाशंकरजी तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि युवा मोर्चा शहर अध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वात ही घोषणा करण्यात आली.

प्रशंसा भोयर यांचा संघटनेतील अनुभव आणि कार्यकुशलता लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली आहे.

यापूर्वी त्यांनी दक्षिण-पश्चिम मंडळ विधी आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख, तसेच दक्षिण-पश्चिम मंडळ आणि त्रिमूर्ती नगर मंडळ येथे युवती प्रमुख म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम पाहिले आहे.या नियुक्तीबद्दल बोलताना मान्यवरांनी विश्वास व्यक्त केला की, प्रशंसा भोयर यांच्या निवडीमुळे नागपूर शहरातील युवतींचे संघटन अधिक मजबूत होईल. याप्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.