
प्रेस नोट
———
गोरेवाडा तलावाच्या दुषित पाण्यावर डॉ. नितीन राऊत यांच्याशी सविस्तर चर्चा
नागपूर :
शहरवासियांकरिता पेयजलाचे मुख्य स्त्रोत गोरेवाडा तलाव आहे. याचे संरक्षण व स्वच्छतेसंदर्भात संबंधित अधिकारी आणि कर्मचारी जरी प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून शहरवासियांना संतुष्ट करीत असले तरी, याची वास्तविक स्थिती मात्र अत्यंत चिंताजनक आहे. अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळ करून एकप्रकारे त्यांना धोका देण्यात व्यस्त आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे हे कायद्याच्या कचाट्यातूनही दूर आहेत.
गोरेवाडा तलावात सोडण्यात येणा-या घाणपाण्यामुळे येथील पाणी दूषित झाले आहे. यामुळे शहरातील नागरिकांवर संकट ओढावणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. याव्यतिरिक्त शहरातील नागरिकांना गुणवत्तेवर आधारित पाणी व्यवस्थापन, पाण्याचे वाटप व संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित होत आहे. असेच राहिले तर भविष्यात विकास योजनांच्या यशस्वीतेवरही प्रश्नचिन्ह लागले आहे. गोरेवाडा तलावातील पाणी प्रदूषित झाल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. २०१९ मध्ये गोरेवाडा तलाव पूर्णपणे रिकामा झाला होता. त्यामुळे याचे संरक्षण, स्वच्छतेप्रती विशेष जागरूक राहून लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. मागील काही दिवसांपासून गोरेवाडा तलावात सोडण्यात येणा-या घाण पाण्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे चिंतीत संघटनेच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली. या समस्येच्या निराकरणासाठी पालकमंत्र्यांनी तत्काळ संबंधित विभागाच्या अधिका-यांना सूचना देऊन समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. चर्चेत गोरेवाडा येथील नैसर्गिक पायवाटेची दुर्दशा आणि विकासात्मक मुद्यांकडेही लक्ष केंद्र केंद्रीत करण्यात आले.
यावेळी गोरेवाडा जंगल ट्रेकर्स ग्रृपचे अध्यक्ष दीपक तभाने, सचिव अरुण कदम, कोषाध्यक्ष दयाराम बावने, अॅड. विलास भांडे, जमाअत ए इस्लामी हिंदचे मीडिया सेक्रेटरी डॉ. एम.ए. रशीद, सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाचे सचिव डॉ. अदनाउल हक, अब्दुल मतीन, परिसंघाचे दिनेश टेंभूर्णे उपस्थित होते.
डॉ. एम. ए. रशीद
मीडिया सेक्रेटरी
जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर
7798727277
9371945556