- नागपुर समाचार

राष्ट्रीय ध्वज : प्लॅस्टिकच्या तिरंग्यावर केंद्राकडून बंदी

राष्ट्रीय ध्वज : प्लॅस्टिकच्या तिरंग्यावर केंद्राकडून बंदी

नवी दिल्ली:  स्वातंत्र दिनापूर्वी केंद्र सरकारने राज्यांना राष्ट्रीय ध्वज यासंबंधी विशेष सूचना दिलेल्या आहेत. केंद्राने राज्यांना सांगितलं आहे की, ‘लोकांकडून प्लॅस्टिकच्या झेंड्यांचा वापर केला जाणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न करावेत.’

स्वातंत्र दिनापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रशासनाला पत्रं लिहिलं आहे. त्यात म्हंटलं आहे की, राष्ट्रीय ध्वज हा लोकांच्या आशा, आकांक्षांचं प्रतिनिधित्व करतं, त्यामुळे त्याला सन्मान राखला गेला पाहिजे.

सरकारचं असं म्हणणं आहे की, प्लॅस्टिकपासून तयार झालेल्या तिरंगा योग्य नाही. कारण, त्याची विल्हेवाट लावण्यामध्ये अडचणी निर्माण होताहेत. राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि खेळ आयोजनामध्ये कागदापासून तयार केलेल्या राष्ट्रीय ध्वजाच्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या ध्वजाचा वापर केला जात आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की, भारतीय ध्वज संहिता २००२ च्या नियमानुसार विविध कार्यक्रमांमध्ये केवळ कागदापासून तयार करण्यात आलेल्या तिरंग्याचा झाला पाहिजे. तसेच कार्यक्रम झाल्यानंतर जमिनीवर झेंडा फेकला जाणार याची काळजी घ्यावी.

राष्ट्रीय ध्वजाबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आणि त्याविषयी सन्मान आहे. प्लॅस्टिकच्या झेंड्याचा वापर केला की, त्याची विल्हेवाट लावणं खूप अडचणीचं जातं. त्यात ते कुठेही इतरत्र पडलेले दिसतात. या पार्श्वभूमीवर कागदांपासून तयार केलेल्या झेंड्यांचा वापर करणं योग्य आहे, त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना हे पत्र पाठवलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *