- मनपा

नेहरुनगर झोन मध्ये १५४२ घरांचे सर्वेक्षण, ९१ कुलर्समध्ये डास अळी मिळाली

नागपूर, ता. ३ : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू आहे. या अंतर्गत घरांघरांमध्ये जाउन मनपा पथकाद्वारे तपासणी केली जाते व डेंग्यू संदर्भात आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. 

            मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी शहरामध्ये ८३२५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून ३६५ घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली. १२४ ताप असलेले रुग्ण आढळून आले. २०१ जणांच्या रक्ताचे नमूने तर २७ जणांचे रक्तजल नमूने घेण्यात आले आहेत. २६४६ घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात २१० कुलर्समध्ये डासअळी आढळून आली. मनपाच्या चमूद्वारे ५०९ कुलर्स रिकामी करण्यात आले. ८८४  कुलर्समध्ये १ टक्का टेमिफॉस सोल्यूशन  तर  ९४३ कुलर्समध्ये २ टक्के डिफ्लूबेंझ्युरोम गोळ्या टाकण्यात आले. तसेच  ३१०  कुलर्समध्ये गप्पी मासे टाकण्यात आले. सर्वात जास्त घरांचे सर्वेक्षण नेहरुनगर व धंतोली झोनमध्ये करण्यात आले. विभागातर्फे १५४२ घरांचे सर्वेक्षण नेहरुनगर व १०२३ घरांचे सर्वेक्षण धंतोली झोनमधे करण्यात आले. नेहरुनगर झोन मधे १५६ घर दूषित मिळाले. तसेच ७२९ कुलर्सची तपासणी करण्यात आली. याच्यात ९१ कुलर्समध्ये अळी आढळली तसेच ४७९ कुलर्स रिकामी करण्यात आली.  

            शहरात डेंग्यूचा प्रसार वाढू नये यासाठी मनपाद्वारे उपाययोजनात्मक जनजागृती सुरू आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून डेंग्यू प्रतिबंधात्मक काळजी घेण्याची गरज आहे. घरात कुठेही पाण्याची साठवण राहणार नाही याची काळजी घ्यावी. पिण्याच्या पाण्याची भांडी व्यवस्थित झाकून ठेवावीत. परिसरात कचरा असल्यास तो साफ करून घ्यावा. स्वच्छता आणि सतर्कता हीच कडी आपल्याला डेंग्यूपासून बचावासाठी महत्वाची आहे, असे आवाहनही मनपाद्वारे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *