नागपूर समाचार : ज्या गतीने शहरीकरण वाढते आहे त्याच गतीने नागरीसेवा सुविधा प्रत्येक भागात पोहोचाव्यात यासाठी स्थानिक प्रशासन संस्था, शासन अधिक दक्षतेने काम करीत आहे. बेसा-बेलतरोडी-पिपळा व नागपूर शहराच्या भोवतालच्या भागात प्राधान्याने नागरी सुविधांवर शासनाने अधिक भर दिला असून नवे नागपूर साकारताना इथल्या पायाभूत सुविधा सर्वांसाठी लक्षणीय ठरल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
बेसा येथे वर्धमान अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. च्या नविन शाखेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार अजय संचेती, बँकेचे अध्यक्ष अनिल पारख, उपाध्यक्ष अश्विन शाह, संचालक अतुलकुमार कोटेचा व इतर संचालक मंडळ उपस्थित होते.
बेसा भागामध्ये ज्या गतीने विकास सुरु आहे ते लक्षात घेता या भागात को-ऑपरेटीव्ह व राष्ट्रीयकृत बँकांची तत्पर सुविधा ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहे. वाढत्या नागपूर समवेत बँकींग क्षेत्राचाही विकास अप्रत्यक्षपणे होत असून ग्राहकांच्या सर्व अत्यावश्यक सेवा-सुविधा वर्धमान बँकेमार्फत प्रभावीपणे दिल्या जातील असा विश्वास पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी व्यक्त केला.
बेसा हा पूर्वी ग्रामपंचायतीचा भाग होता. येथील विकासाला गती मिळावी व दिशा मिळावी यादृष्टीने आपण येथे नगर पंचायत निर्माण केली. यातून नागरी सेवा सुविधाबाबत हक्काची स्थानिक स्वराज्य संस्था मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार अजय संचेती यांनी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बँकेचे संचालक अतुलकुमार कोटेचा यांनी केले.
https://shorturl.fm/8qpud
https://shorturl.fm/YNAM8
https://shorturl.fm/DPDgj
https://shorturl.fm/8kS2o
https://shorturl.fm/JUsnb
https://shorturl.fm/uxIij
https://shorturl.fm/qhP7k