- कोविड-19, नागपुर समाचार

भाजप वैद्यकीय आघाडीचे देवेंद्र फडणविसांना कोविड बेड्स वाढविण्यासाठी दिले निवेदन 1000 रमीडिसीवीर इंजेकशन लवकरच उपलब्ध करून देण्याचं आश्वासन : देवेंद्र फडणवीस

नागपुर समाचार : 27 मार्च, संपूर्ण महाराष्ट्र आज कोविड वैश्विक महामारी च्या दुसऱ्या लाटेला सामोरे गेले आहोत. नागपूर जगातील हॉट स्पॉट म्हणून ओळखलं जात आहे. एका दिवसात 54 मृत्यू हीं विदारक परिस्थिती आहे. या परिस्थितीत मेडिकल कॉलेज येथे प्रशासन अत्यंत दुर्लक्षित पणे वागणूक देत आहे. ऑक्सिजन प्लांट सुद्धा 1 वर्षा पासून तयार झालेला नाही त्याकरिता आलेला पैसा कुठे गेला त्याचा हिशोब नाही. ऑक्सिजन च्या अभावी एका खाटेवर 3रुग्ण ऑक्सिजन घेत आहेत. कोविड वार्ड हा रेसिडंट डॉक्टर वर सोडून दिलेला आहे. 12 तास च्या लेक्चरर ची ड्युटी नाही. प्रोफेसर फक्त राउंड ला येतात.

मागील 6-8 महिने केसेस कमी असताना बेडस ची व NIV ची व्यवस्था केली गेली नाही. डीन कार्यालयात न भेटता VC मध्ये व्यस्त आहेत अशी उत्तर मिळतात. ऑक्सिजन अभावी मृत्यू होत आहेत. ग्रामीण व शहरी भाग मिळून 10% बेडस सुद्धा नागपुर ला नाही. मेडिसिन ची कमतरता दुर करावी लागेल. दीनदयाल थाली रुग्ण नातेवाईक साठी सुरू करावी लागेल. याकरिता आपण जातीने लक्ष देऊन मेडिकल ला भेट दयावी अशी नम्र विनंती भाजपा वैद्यकीय आघाडी द्वारा करण्यात आली.

कोविड रुग्णाचे वाढते प्रमाण तसेच शासकीय आरोग्य रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठी त्वरित बेड्स ची उपलब्धता व्हावी, रुग्णांसाठी औषधी व रामेडिसिवीर इंजेकशनचा पुरवठा वाढवून त्वरित तोडगा निघावा यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते श्री देवेन्द्रजी फडणवीस यांची भेट घेतली. लवकरच हा विषय मार्गी लावणार असून 1000 रामेडिसिवीर इंजेकशन त्वरित देण्याचे आश्वासन विरोधी पक्षनेते श्री देवेन्द्रजी फडणवीसांनी दिले.

त्याचप्रमाणे वृद्धासाठी वॅक्सीन केंद्रावर पोहचवण्यासाठी मनपा तर्फे फ्री बस सेवा सुद्धा लवकरच सुरु करू, त्यासंबंधी सत्तापक्षनेते अविनाशजी ठाकरे यांचेशी बोलण करून त्वरित मार्ग काढण्या चे आश्वासन फडणवीस यांनी दिले,या सर्व मुद्द्यावर त्वरित मार्ग निघावा या उद्देशाने भाजप वैद्यकीय आघाडीचे शहर अध्यक्ष डॉ गिरीशजी चरडे, सहकारी डॉ श्रीरंग वराडपांडे, डॉ ज्ञानेश ढाकुलकर व आघाडीचे पदाधिकारी यांनी मा.देवेंद्रजींची भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *