- Breaking News, नागपुर समाचार

लोकसभा चुनाव 2024 : नवमतदारांचा उत्साह बघून व्यक्त केला आनंद; नागपूरकरांचे मानले आभार

नितीन गडकरींनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा चुनाव 2024 :- नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. महालच्या टाऊन हॉल येथील मतदान केंद्रावर ना. श्री. गडकरी यांच्यासोबत सौ. कांचन गडकरी, श्री. निखील व सौ. ऋतुजा गडकरी, श्री. सारंग व सौ. मधुरा गडकरी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव आपण साजरा करीत आहोत आणि त्यात नागपूरकर अतिशय उत्साहाने सहभागी झालेत, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. मतदान केल्यानंतर गडकरींनी सर्व सहा मतदारसंघांमध्ये फेरफटका मारला. यावेळी नवमतदारांचा उत्साह बघून त्यांनी आनंद व्यक्त केला. प्रत्येक बुथवरील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला आणि मतदानाच्या प्रक्रियेत सर्वसामान्य जनतेचे सहकार्य करीत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. 

नागपूरकरांचे आभार

नागपूर लोकसभा क्षेत्रातील सर्व मतदारांचे आभार. भाजप कार्यकर्त्यांनी कडाक्याच्या उन्हात आणि अवकाळी पावसात उत्साहाने काम केले, त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. आज दिवसभर बुथवर कार्यकर्ते आणि नागरिकांना भेटल्यानंतर निर्धारित केलेले लक्ष्य साध्य होईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.

कुऱ्हे आणि खेमानी परिवाराचा आदर्श

तात्या टोपे नगर येथील अभिनव राम कऱ्हू (३८) यांचे १९ एप्रिलला सकाळी निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी त्यांच्या मातोश्री मैथिली कऱ्हू आणि पत्नी श्रुती कऱ्हू या दोघीही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराच्या बाहेर पडल्या. कुटुंबावर संकट कोसळले असले तरीही राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी घराबाहेर पडून कऱ्हू कुटुंबाने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. त्याचवेळी बगडगंज येथील खेमानी परिवाराने देखील आपल्या कृतीतून सर्वांचे लक्ष वेधले. बगडगंज येथील श्री. मदन मोहन खेमानी (७४) यांचे १८ एप्रिल २०२४ ला निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊन चोवीस तासही उलटायचे असताना कुटुंबातील २७ सदस्य मतदानासाठी बाहेर पडले आणि आदर्श प्रस्थापित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *