- Breaking News, नागपुर समाचार

कामठी समाचार : कामठी विधानसभा मतदार संघात सरासरी 60 टक्के मतदान

कामठी समाचार :– आज 19 एप्रिल ला सकाळी 7 ते सायंकाळी सहा पर्यंत पार पडलेल्या रामटेक लोकसभा मतदार संघ निवडणूक मतदान अंतर्गत कामठी विधानसभा अंतर्गत सरासरी 60 टक्के मतदान शांततेत पार पडले.

रामटेक लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश असून ज्यामध्ये काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड,कामठी व रामटेक चा समावेश आहे हे सहाही विधानसभा मतदार संघातील एकूण मतदार संख्या ही 20 लक्ष 46 हजार 435 आहे .त्यात कामठी विधानसभा मतदार संघात 4 लक्ष 65 हजार 399 मतदारांचा समावेश होता .त्यात 2 लक्ष 35 हजार 71 पुरुष,2 लक्ष 30 हजार 313 स्त्री मतदार तर 15 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. कामठी विधानसभा मतदार संघात एकूण 508 मतदान केंद्रावर झालेल्या निवडणूक मतदानात 60 टक्के मतदान शांततेत पार पडले.

आज सकाळपासूनच या लोकशाहीच्या उत्साहात सर्वांनी उत्साहाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.मात्र कामठी विधानसभा निवडणूक प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षित व हलगर्जीपणा मुळे कामठी येथील बहुतेक मतदार हयात असूनही मतदार यादीत नावे नसल्याच्या नावाखाली नाहक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले तसेच बहुतेक मतदारांचे नावे शहराबाहेर असलेल्या कळमना मतदान केंद्रात असल्याने अशाही मतदारांना मतदानापासून वंचीत राहावे लागले.तेव्हा मतदानापासून वंचीत ठेवणाऱ्या प्रशासनावर शासन काय कारवाही करणार का?असा प्रश्न येथील जागरूक नागरिक करीत आहेत.

बॉक्स:-कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या मतदान केंद्र क्र 71 मध्ये कार्यरत पोलीस कर्मचारी तसेच मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्याकडे कुणीही लक्ष न पुरविल्याने उपस्थित पोलीस सह इतर कर्मचाऱ्यांना पाण्याविना राहावे लागले.बहुतेक मतदान केंद्रावर मंडपची सोय न केल्याने मतदारांना भर उन्हात उभे राहून मतदान करावे लागले सरतेशेवटी सुविधा नसूनही मतदानाच्या उत्साहात रखरखत्या उन्हातही मतदान करून कर्तव्य पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *