- Breaking News, नागपुर समाचार

रामटेक समाचार : रामटेकच्या गढावर ‘धनुष्य-बाणा’च्या विजयाची होणार हॅट्रिक – राजू पारवे

◾मतदरांचा उत्साह महायुतीचा विजय निश्चित

◾पं. नेहरू शाळेच्या मतदान केंद्रात राजू पारवेंचे सहपत्निक मतदान

रामटेक समाचार :- देशाचे सक्षमीकरण करण्यासाठी होऊ घातलेल्या रामटेक लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदान केंद्रावर मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग आज पाहायला मिळाला. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमित जागरूक मतदारांनी नरेंद्र मोंदीना पुन्हा पंतप्रधान बनविण्याचा निर्धार या झालेल्या मतदानातून स्पष्ट होत आहे. रामटेक लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या हिंगणा, सावनेर, काटोल, उमरेड, रामटेक व कामठी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक गावात जनतेचा सहभाग हा पाहण्याजोगा होता. रामटेकच्या मतदारांनी गेली दोन निवडणूकांमध्ये शिवसेनेच्या ‘धनुष्य-बाणा’वर विश्वास ठेवत विजय मिळवून दिले. त्यामुळे आगामी 4 जूनच्या निकालात रामटेकच्या गढावर ‘धनुष्य-बाणा’च्या विजयाची हॅट्रिक होणार असल्याचा विश्वास महायुतीचे रामटेक लोकसभा मतदार संघाचे शिवसेना उमेदवार राजू देवनाथ पारवे यांनी केला. शुक्रवारी सकाळी उमरेड, परसोडी येथील पंडीत नेहरु उच्च प्राथमिक शाळेत राजू पारवे सहपत्निक मतदान केले. मतदान केंद्रात पहिले मत बजाविल्याचेही यावेळी राजू पारवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

पुढे बोलतांना राजू पारवे म्हणाले की, देशाच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक मतदाराचे मतदान महत्त्वपूर्ण व निर्णायक असते. रामटेक लोकसभा निवडणुकीच्या पर्वामध्ये सहाही विधानसभा क्षेत्रात जनतेने स्वत: हून बाहेर पडून मतदानाचा हक्क बजाविला. यात जेष्ठांसह तरुणांचा सहभाग हा उत्सर्फूत दिसून आला. देशासह जगात परिवर्तन घडविण्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आहे. गेली दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने देशाला विकसित भारताकडे नेण्याचे काम केले. गावापासून तर शहरापर्यंत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना मोंदीनी केलेली कामे त्यांना पुन्हा पंतप्रधान करणार हे निश्चित आहे.

रामटेकच्या विकासाकरिता महायुतीला आज मतदारांनी विश्वास दाखिवल्याचे दिसून आले आहे. आगामी 4 जूनच्या मतमोजनीत प्रत्येक केंद्राच्या मतपेटीतून ‘धनुष्य-बाणा’ला प्रचंड मत पडतील असा मला विश्वास असल्याचे राजू पारवे म्हणाले. रामटेक क्षेत्रातील सर्व मतदारांनी लोकशाहीच्या पवित्र पर्वात सहभागी झाल्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. तसेच या निवडणूकीत तनमन धनाने माझ्यासोबत दिवस रात्र प्रचारात महायुतीत असलेल्या सर्व पक्षातील पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतले त्यांचे मी मनापासून आभार मानत असल्याचेही राजू पारवे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *