- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपुर समाचार : रामायण हा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करा तरच भारत हिंदू राष्ट्र होईल : बागेश्वर सरकार

नागपूर समाचार : बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या हस्ते रेशीमबाग प्रांगणात रामकथेला तिसऱ्या दिवशी प्रारंभ झाला छत्रपती शिवरायांचे गुणगान करताना गुरुजी म्हणाले की, छत्रपतींनी सनातनचा असा ध्वज फडकावला की आज प्रत्येक हिंदूला स्वतःचा अभिमान वाटतो! अंधश्रद्धा पसरवणाऱ्या खोट्या बाबांच्या, भूतबाधाच्या बाजूने आम्ही नाही! गुरुजी रामकथेचे पठण करत असताना रामायणातील अनेक घटनांबाबत सांगतांना म्हणाले रावण आपली पत्नी मंदोदरीला एकटीने रडत सांगत असे की त्याचे प्रभू रामावर किती प्रेम आहे कारण रावणाचे गुरु भगवान शंकर होते, भगवान शंकर भगवान रामावर विश्वास ठेवत होते! म्हणूनच तो रामावर प्रेम करतो! शास्त्रीजी म्हणाले.

जगाची प्रत्येक प्रतिष्ठा रामायणात लिहिली आहे! जगायचे कसे हे रामायणातून शिकायला हवे! रामायण हा एक अद्भुत ग्रंथ आहे! हिंदू राष्ट्राची कल्पना करणार्‍यांना आवाहन करून गुरुजींनी स्पष्ट शब्दात सांगितले की, भारत तेव्हाच हिंदू राष्ट्र होईल जेव्हा रामायण हा राष्ट्रीय ग्रंथ घोषित होईल! गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिले आहे! रामायण हा राष्ट्रीय ग्रंथ बनवण्याची इच्छा गुरुदेवांनी व्यक्त केली , बागेश्वर सरकार यांच्या रामकथेतील भक्तांची प्रचंड गर्दी बघून त्यांच्या देशभरातील प्रचितीचा अंदाज सहज बांधता येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *