- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : इंदोरा चॊक येथिल अर्धवट मेट्रो रेल स्टेशन त्वरित पुर्ण करा; मेट्रो रेल प्रसाशनाच्या विरोधात जनांदोलन

इंदोरा रहवाशी मेट्रो रेल ला “लाल झंडी” दाखवणार

नागपूर समाचार : इंदोरा चॊक मेट्रो रेल स्टेशन प्रस्तावित असुन रेल प्रशासना व्दारे स्टेशन उभारणी कार्याला सुरवात करणे गरजेचे होते. नागपुर शहरातिल मेट्रो रेल प्रकल्प जवळपास पुर्णत्वाला आले आहे. असे असतांना देखिल इंदोरा चॊक मेट्रो रेल स्टेशन तयार करण्यास प्रशासन चालढकल करित आहे. इंदोरा परिसरात वास्तव्य असलेल्या जनतेचा, कष्टक-यांचा, व्यापा-यांचा, दुकानदारांचा, विध्दार्थी, नोकरदारांचा अपमान आहे. आर्थिक तंगी चे कारण मेट्रो प्रशासन देत आहे. शुध्द घुळफेक असुन रेल प्रशासन आकसाचि व दुटप्पी कार्यवाही करीत आहे.

शहरात सर्वत्र मेट्रो रेल स्टेशन निर्माण झालेले असुन फक्त इंदोरा स्टेशन अर्धवट तयार करण्यात आले आहे. आर्थिक फंड उपलब्ध नाही ही संतापजनक व निषेधार्थ आहे.

इंदोरा चॊक मेट्रो रेल स्टेशनची निर्मिती कार्यास सुरवात करण्यास प्रशासनाला बाध्य करण्यास इंदोरा चॊक मेट्रो रेल स्टेशन निर्मिति कुति समिति व्दारा आज दी. १०-९-२०२२ रोजी इंदोरा चॊक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. लक्षवेधी धरणा जनांदोलनात मोठ्या संख्येंनी नागरिक उपस्थित होते. धरणे आंदोलन स्थळी मेट्रो रेल प्रशासनाचे मा. अखिलेश हळवे यांनी निवेदन स्विकारले.

इंदोरा चॊक मेट्रो रेल स्टेशन कूति समिति तर्फे करण्यात आलेल्या या जनांदोलनात उपस्थित मान्यवरांनी निषेध केला व प्रशासनाच्या विरोधात निर्दशने करण्यात आले.

यावेळी बाळु घरडे, अनिल वासनिक, तुका कोचे, भिमराव चवरे, नवनित मोटघरे, हेमराज टेंभुर्णे, हरिष लांजेवार, मुकुंद पाटिल, प्रा. सुखदेव चिंचखेडे, छोटु इंगळे, संदेश खोब्रागडे, लश्र्मीकांत मेश्राम, रोशन ढवळे, अनुसया अंबादे, राहुल मेश्राम अमन मेश्राम, सक्षम घरडे, दुकानदार, आटो चालक, व्यापारी नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *