- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : कडक कारवाई व धाडसत्र सुरू करणार : जिल्हाधिकारी विमला आर.

नायलॉन मांजावर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना

नागपूर समाचार : राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे.मात्र तरीही शहरात हा धागा वापरला जात असल्याचे दिसून येते. आता यासंदर्भात कठोर निर्णय घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एका समितीची घोषणा केली आहे. निर्मितीच्या ठिकाणी धाडी टाकण्यापासून तर जनजागृती करण्यापर्यंत ही समिती कारवाई करणार आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी या संदर्भात आज एक निर्देश काढून समिती घोषित केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर निर्देश देताना न्यायालयाने विदर्भातील प्रत्येक शहरात विशेष पथक स्थापन करण्याचा आदेश दिला आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करताना 21 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी नागपूर जिल्ह्यात व्यापक जनजागृती करणे, बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच अशा पद्धतीचे उत्पादन करणाऱ्या ठिकाणांना शोधून कारवाई करणे, यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. यामध्ये महानगरपालिका आयुक्त, पोलीस विभागाच्या विशेष शाखेचे उपायुक्त, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, सायबर सेल प्रमुख, पर्यावरण व प्रदूषण विभाग, नागपूर मेट्रो विभाग, तसेच जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका शाखा, यांचा समितीमध्ये सहभाग असेल. ही समिती येणाऱ्या काळात शहरातील या दुर्घटने संदर्भात बारकाईने लक्ष वेधून असेल.

जिल्हाधिकारी आर विमला यांनी अशा पद्धतीचा मांजा न वापरता पतंगोत्सव साजरा करा. मात्र घरातील प्रत्येक वडीलधाऱ्यांनी आपला मुलगा कोणता मांजा वापरतो याकडे लक्ष वेधावे. गेल्या काही दिवसात मांजा अडकून जीवाला मुकण्याच्या गंभीर घटना घडलेल्या आहेत.शहरांमध्ये अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी जागरूक नागरिक म्हणून नागरिकांनी देखील सहकार्य करावे. तसेच गरज भासली तर पोलिसांना अवगत करावे, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *