- नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : बुधवारी ४८ पतंग दुकानांची तपासणी

३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.२२) प्लास्टिक पतंग विरोधात शहरातील ४८ पतंग दुकानाची तपासणी केली. याशिवाय उपद्रव शोध पथकाने ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने शहरातील ३२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *