
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने ‘जागतिक अपंग दिन’ साजरा करण्यात आला
नागपूर समाचार : महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान, सेवानिवृत्त सभासद व कोविड योद्धांचा सत्कार तसेच बेरोजगार गरजू दिव्यांगांना शिलाई मशीन चे वाटप सोहळा संपन्न उद्घाटक मा. श्री. योगेश कुंभेजकर भाप्रसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर अध्यक्ष मा. डाँ. श्री. सिद्धार्थ गायकवाड प्रादेशिक उपायुक्त सामाजिक न्याय, मुख्य अतिथी मा. डॉ. श्री. कमलकिशोर फुटाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर मा. श्री. चिंतामण वंजारी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर मा.श्री. किशोर भोयर समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नागपूर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक श्री. विलास भोतमांगे जिल्हा अध्यक्ष तथा राज्य कोषाध्यक्ष यांनी केले कार्यक्रम आयोजनाचा उद्देश, संघटनेचे कार्य, रुपरेषा विशद केली.
मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. संघटनेचे वतीने सर्व पाहुणे यांचा स्मृतिचिन्ह शाँल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कोविड काळात अतुलनीय कार्य केल्याबद्दल आठ सदस्यांना कोविड योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चौदा सेवानिवृत्त सभासदांना शाँल श्रीफळ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तर पाच बेरोजगार गरजू दिव्यांगांना अँटोमँटिक शिलाई मशीन चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माननीय कुंभेजकर साहेब यांनी जिल्हा परिषद अंर्तगत कार्यरत कर्मचारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार तसेच दिव्यांगांनी आदर्श कार्य करीत राहावे असा सल्ला दिला. डॉ. फुटाणे यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करुन काही सूचना केल्या.श्री. वंजारी यांनी दिव्यागांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.
श्री. भोयर यांनी दिव्यागांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले तर डॉ. गायकवाड यांनी अध्यक्षिय भाषणातून दिव्यागांसाठी असणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली व या क्षेत्रात आणखी काय काय करता येईल याचे सविस्तर मार्गदर्शन केले.vसर्व मान्यवरांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.
याप्रसंगी श्री. नामदेव बलगर, श्री. रणजित जोशी, श्री. पांडुरंग टेकाडे, श्री. सुभाषचंद्र बोस, श्री. मनोहर दुरबळे ही सल्लागार मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विलास भोतमांगे जिल्हा अध्यक्ष तथा राज्य कोषाध्यक्ष यांनी केले तर संचालन श्री अनंत ढोले व श्री. शितलकुमार मेश्राम यांनी व आभार श्री राजू धवड जिल्हा सचिव तथा राज्य सहसचिव यांनी मानले.bमंचावर राज्य उपाध्यक्ष श्री. ओंकारनाथ दाणी, जिल्हा कोषाध्यक्ष श्री. संजय मानवटकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. रामराव सातपूते,श्री. मोहन आदमने, श्री. वासुदेव निकोसे, श्री. नारायण चापले,श्री. प्रविण सोरते, श्री. राजकुमार चोपकर, श्री. रामविजय गंथाडे, श्री. रविदास तांडेकर, सौ.मंगला पेशने, श्रीमती कुसूम नारायणे, श्रीमती कविता वर्हाडे, श्रीमती ज्योती आष्टनकर, कु. अमृता अदावले यांनी अथक परिश्रम घेतले, कार्यक्रमाला जवळपास 250 सभासद उपस्थित होते. सर्वांना नास्ता वाटप करण्यात आला व शेवटी वंदेमातरम नी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.