- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : गितांजली चौक ते गांधीसागर तलाव रोडच्या भूमिअधिग्रहणासंबंधी महापौरांनी घेतला आढावा

गितांजली चौक ते गांधीसागर तलाव रोडच्या भूमिअधिग्रहणासंबंधी महापौरांनी घेतला आढावा

नागपूर समाचार : शहरातील गितांजली चौक ते गांधीसागर तलाव रोडच्या कार्यामध्ये आवश्यक भूमिअधिग्रहणासंदर्भात तातडीने कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी मागील (२८ सप्टेंबर) झालेल्या बैठकीत दिले होते. यासंबंधी महापौर दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी (ता. २९) संबंधित विभागाकडून आढावा घेतला. शुक्रवारी (ता. २९) सदर विषयाच्या अनुषंगाने मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली.

महापौरांनी सांगितले की, भूमी अधिग्रहणासंबंधी शासनाकडून निधी प्राप्त झाली आहे. येथील नागरिकांना रेडीरेकनर दरानुसार मोबदला देण्यात येईल. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी लवकरात लवकर भूमी अधिग्रहण संबंधी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यांनी आतापर्यंत केलेल्या अधिग्रहण कार्यवाही संबंधात माहिती दिली.

बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह उपमहापौर मनीषा धावडे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., उपायुक्त विजय देशमुख, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, मनपाचे मुख्य अभियंता प्रदीप खवले, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, कार्यकारी अभियंता धनंजय मेंढुलकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) हेमा बढे आदी उपस्थित होते.

गितांजली चौक ते गांधीसागर तलाव रोड हा नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असून यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे. महापौरांकडे प्राप्त संमतीपत्रांबाबत आवश्यक कार्यवाही करून भूमिअभिलेख कार्यालय आणि मनपाच्या नगर रचना विभागाने समन्वयाने आवश्यक ती संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी. तसेच यासंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण करून अंतिम स्वरूप सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संबंधित विभागांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *