- नागपुर समाचार, मनपा

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या वेअर हाऊसमध्ये वृक्षारोपण

नागपूर, ता. २१ : नागपूर शहरात रिकाम्या मैदानांवर ‘ऑक्सिजन झोन’ तयार करण्याच्या महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पाच्या अनुषंगाने पूर्व वर्धमान नगर स्थित फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्य वेअरहाऊसमध्ये शनिवारी (ता. २१) वृक्षारोपण करण्यात आले. 

महापौर दयाशंकर तिवारी हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपमहापौर मनीषा धावडे, दुर्बल घटक समितीच्या सभापती कांता रारोकर, प्रभाग क्र. २४ चे नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती प्रदीप पोहाणे, पूर्व नागपूर भाजपचे महामंत्री जे.पी. शर्मा, अशोक सावरकर, भाजपचे पूर्व नागपूर मीडिया प्रमुख मनोज अग्रवाल, आशीष धावडे, गुणवंत चौहान, नंदकुमार सोनी, लखन श्रीवास, राजेश खापरे, देविदा चोखट, महेंद्र कटारिया, रवि भोजने, आरती ढोमणे, माया अतकरे, हिरा मेहाडे, आनंद शाहू आदी उपस्थित होते. 

वृक्षारोपणाचा शुभारंभ महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित सर्व पाहुण्यांनी व नागरिकांनीही यावेळी वृक्षारोपण केले. याप्रसंगी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, कोरोना काळात या शहराला ऑक्सिजनची कमतरता जाणवली. ऑक्सिजनचे महत्त्व प्रत्येक व्यक्तीला या काळात कळून चुकले. त्यामुळे कृत्रिम ऑक्सिजनसोबतच नैसर्गिक ऑक्सिजन तयार करण्यासाठी शहरातील विविध खुल्या मैदानात ऑक्सिजन झोन तयार करण्याचा संकल्प नागपूर महानगरपालिकेने केला आहे. ऑक्सिजन झोनमध्ये कमीत कमी २५० आणि अधिकाधिक १००० वृक्ष लावण्यात येत आहे. विविध भागातील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन ऑक्सिजन पार्क निर्मितीला सुरुवात केली आहे. नागरिकांनीही आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले. वृक्षारोपण करण्यात आलेल्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वेअरहाऊसमध्ये सुमारे ३०० वृक्ष लावण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *