- नागपुर समाचार

सीतानगर वसाहत नागपूर येथे स्वतंत्रता दिवस साजरा केला गेला।

नागपुर:- नागपूर येथील सीतानगर(सोमलवाडा) वस्तीत पद्म समाजभूषण प्रा.विजयराव यंगलवार यांच्या शुभहस्ते स्वंतंत्र दिवसा निमित्त कार्यक्रमात ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रम शुरू होण्या पूर्वी स्वर्गीय कोरोना योध्यांना भावपूर्ण श्रध्दांजली व आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर “शांतीज्योत प्रज्ज्व लित करून,राष्ट्रपिता म.गांधीजी व शहीद स्व. अशोकजी चकोले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री शरदराव पुसदकर उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गोपाळराव मानकर, प्रा. विजय यंगलवार व श्री वासुदेवराव रागीट हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे श्री मानकर व प्रा.यंगलवार यांची समयोचित भाषणे झालीत.श्री पुसदकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. प्रास्ताविक श्री रघुनाथराव रागीट यांनी केले.

                       सीतानगर मधील खालील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षिकांचा सत्कार सर्वश्री पुसदकर, मानकर, प्रा.यंगलवार, वासुदेवराव रागीट यांच्या शुभहस्ते स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.(१)श्रीमती आशाताई सोविंदराव थोटे,(२)श्रीमती भारती शंकरराव भुरे,(३)श्री अशोकजी मदनराव कुनघाटकर.त्यानंतर दहावी व बारावी उत्तीर्ण खालील गुणवंत मुला-मुलींचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.(१)कु.रिध्दी राजेशजी हिंगे,(२)अथर्व सुधाकरराव सातपुते,(३)कु.साक्षी प्रमोदजी हिंगे,(४)कु. सारिका नितिनजी टेकाडे,(५)कु.कांचन राजूजी खंते,(६)कु.मयुरी नरेश सहाकाटे,(७)कु.सास्वती सिसिर घोष,(८)कु.गायत्री शरद गावंडे,(९)कु.खुशी पुरुषोत्तम आंबिलडुके. त्यानंतर लहान मुला-मुलींनी गीत व भाषण सादर केले.सीतानगर महिला भजन मंडळच्या सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन श्री गजाननराव चकोले यांनी केले,तर आभार प्रदर्शन श्री किशोर चन्ने यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *