- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर : बॅलस कॅटिलिव्हर ब्रिजचे निर्माण कार्य ५२ % पूर्ण

सुमारे २५ मीटर उंचीवरून धावणार मेट्रो

नागपूर समाचार : महा मेट्रोने निर्माण कार्याच्या सुरुवातीपासूनच विविध नाविन्यपूर्ण निर्माण कार्य केले असून प्रत्येक ठिकानचे डिजाइन आंतरराष्ट्रीय आर्किटेक्टचा उत्कृष्ट नमुना आहे ज्यामध्ये मल्टी लेयर ट्रांसपोर्ट सिस्टम,डबल डेकर उड्डाणपूल इत्यादींचा समावेश आहे. महा मेट्रो पूर्व पश्चिम कॉरिडोरवर देशातील २३१ मीटर लांबीचा ब्रिज आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आनंद टॉकीज, सिताबर्डी ते कॉटन मार्केट पर्यत निर्माण करीत आहे. अश्या प्रकारचा हा पूल देशात तिसऱ्या क्रमांकाचा असणार आहे.

पुलाचे निर्माण कार्य ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा महा मेट्रोचा मानस असून इंजिनियरिंगचा एक नमुना आणि नागपूरसाठी एक लँडमार्क ठरणार आहे. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली महा मेट्रो नागपूर एक अत्याधुनिक पुलाचे निर्माण करीत आहे.

आपल्याला माहिती आहे कि, नागपूर रेल्वे जंक्शन हे देशातील सर्वात महत्वाचे रहदारीचे स्टेशन असून रेल्वे रुळाच्या वरून मेट्रो ट्रॅकचे निर्माण कार्य आव्हानात्मक आहे. या रेल्वे क्रॉसिंग वरून निर्माण कार्य करण्याकरिता विविध चर्चा रेल्वे प्रशासन (मध्य रेल्वे), कन्स्लटंट यांच्या सोबत अनेकदा सर्वे केल्यानंतर बॅलस कॅटिलिव्हर ब्रिज निर्माण कार्य करण्यासंदर्भात मार्ग निघाला कारण ते निर्माण कार्य सुरक्षित आणि किफायतशीर होते.

बॅलस कॅटिलिव्हर ब्रिजला कॅटिलिव्हर कंस्ट्रव्कशन ब्रिज म्हणून देखील ओळखल्या जातो. २३१.२ मी लांबीचा हा पूल नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या रिच – ४ मार्गिकेवर आहे. सध्यास्थितीत आनंद टॉकीज येथे सिताबर्डी ते कॉटन मार्केट दरम्यान निर्माण कार्य सुरु आहे.

या ठिकाणचे निर्माण कार्य मध्य रेल्वेने मंजूर केलेल्या योजनेनुसार जेव्हा रेल्वेगाड्या प्रतिबंधित असतात रेल्वे ट्रॅकिक ब्लॉक दरम्यान हे कार्य केल्या जाते. साधारणतः जास्तीत जास्त ३ तासाकरिता रात्रीच्या वेळी जेव्हा ट्रेनचे संचालन कमी असते त्यावेळी या ठिकाणी निर्माण कार्य केल्या जाते. महा मेट्रोने आतापर्यंत ५२% या ठिकाणचे निर्माण कार्य सुरक्षा मार्गदर्शकाचे पालन करून रेल्वे वाहतुकीला अडथळा न पडता पूर्ण केले आहे. हे केवळ योग्य टीम वर्क, नियोजन, डिझाइन व रेखाचित्रांची मंजुरी, रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे ब्लॉक करता रेल्वे अधिकाऱ्याशी समन्वय साधून शक्य झाले आहे.

भारतीय रेल्वेच्या ट्रॅक वरून १०० मीटरचा एक स्पॅनचे (३ मीटरचा एक गर्डर) असणार आहे. या पुलाचे कार्य पूर्ण झाल्यावर तो अभियांत्रिकीच्या क्षेत्रात एक आकर्षण ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *