- नागपुर समाचार

यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त म.न.पा तर्फे अभिवादन.

NBP NEWS 24.

नागपूर ता. १२ मार्च: महाराष्ट्र राज्याचे प्रथम मुख्यमंत्री , आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व माजी उपप्रंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या १०८ व्या जयंती निमित्त शुक्रवारी (१२ मार्च) रोजी मा.महापौर श्री. दयाशंकर तिवारी व मा.उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी म.न.पा. केंद्रीय कार्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन ‍विनम्र अभिवादन केले. यावेळी सत्तापक्ष नेता श्री. अविनाश ठाकरे, कर आकारणी व कर संकलन समिती उपसभापती श्री. सुनील अग्रवाल, अति.आयुक्त श्री. राम जोशी व श्री. संजय निपाणे, उपायुक्त श्री. निर्भय जैन व श्री. रविन्द्र भेलावे, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेन्द्र उचके, अति.सहा.आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते.
तसेच अजनी चौक स्थित पुतळयाला मा. उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी आमदार श्री. दिनानाथ पडोळे, माजी नगरसेवक श्री. दिलीप पनकुले, बजरंगसिंग परिहार, जानबा मस्के, तात्यासाहेब मते, सरदार रविन्द्र मुल्ला, सरदार चरणसिंग चौधरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *