- कोविड-19, नागपुर समाचार

शुक्रवारी ६ प्रतिष्ठानांवर कारवाई

नागपूर, ता. १२ : नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. १२ मार्च) रोजी ६ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. ४०,००० चा दंड वसूल केला. यामध्ये वैशाली साडी सेंटर आणि निकम ज्वेलर्सवर लावण्यात आलेल्या प्रत्येकी रु. १०,०००/- दंड समाविष्ट आहे. पथकानी ७१ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *