
नागपूर : नागपूरसह विदर्भात कोरोनाचा उद्रेक निर्माण झाला असून २४ तासात नागपुरात ११८१ बाधित रुग्ण आढळले असून दुसऱ्या लाटेतील ही सर्वोच्च संख्या आहे. तर २४ तासात १० जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासात ११८१ बाधित रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले आहे. कोणत्याही क्षणी नागपुरात संचारबंदिची लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
२४ तासात ११८१ बाधित रुग्ण आढळले असून त्यात ९५५ शहरातील २२४ ग्रामीणमधील तर २ जिल्ह्याबाहेरील रुग्णांचा समावेश आहे. आज १०५८४ चाचण्या झाल्या असून त्यात ११८१ बाधित रुग्ण आढळले आहेत जसजस्य चाचण्या वाढतील तसतशी कोरोनाबाधितांची संख्या वाढणार आहे. आतापर्यंत १४५७१५ बाधित रुग्ण आढळले आहेत. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ७ शहरातील १ ग्रामीण भागातील २ इतर जिल्ह्यातील आहेत. ४५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.१२ आहे. आज शहरात १०५८४ चाचण्या झाल्या असून ६४७४ शहराती