- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर : महावितरणकडून जिल्ह्यातील विदुयत शाखेतील बेरोजगार अभियंत्यांना १२ कोटीचे कामे

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील विदुयत शाखेतील १८१ बेरोजगार पदवी आणि पदविकाधारक अभियंत्यांना महावितरणकडून या आर्थिक वर्षात ११. ६५ कोटी रुपयांची कामे लॉटरी पद्धतीने वितरित करण्यात आली. काटोल रोड येथील ग्रामीण मंडल कार्यालय आणि गड्डीगोदाम येथील शहर मंडल कार्यालयात स्वतंत्रपणे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कोविड -२०१९ च्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्या दरम्यान महावितरणकडून आवश्यक असणारी खबरदारी घेण्यात आली होती. तसेच उमेदवारांना २ सत्रात आमंत्रित करण्यात आले होते. नवीन वीज वाहिनी उभारणे, नवीन वीज खांब टाकणे, भूमिगत वीज वाहिनी टाकणे, वीज उपकेंद्राची दुरुस्ती आदी कामांचा यात समावेश आहे.

विदुयत शाखेतील पदविकाधारक आणि पदवीधारक तरुण/तरुणींना महावितरणकडून १० लाख रुपया पर्यंतची कामे विना निविदा देण्याची तरतूद केली आहे. ही कामे एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास लॉटरी पद्धतीने वाटल्या जातात. पहिल्या वर्षात मिळालेली कामे सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंत्याने मुदतीत व यशस्वीपणे पूर्ण केली तर त्यांना दुसऱ्या वर्षी प्रत्येकी १५ लाख रुपयांची वार्षिक कामे थेट लॉटरी पध्दतीने देण्यात येतील. अशी माहिती महावितरणकडून उपस्थितांना देण्यात आली.

विदुयत परवाना मिळवण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र, अनुभव या संदर्भात उपस्थित उमेद्वारांना नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, शहर मंडल मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी माहिती दिली.

या अगोदर विदुयत परवाना मिळवण्यासाठी उमेदवाराने स्थानिक जिल्हा विदुयत निरीक्षक कार्यालयात अर्ज केल्यावर तो पुढील कारवाईसाठी मुंबई येथे पाठविल्या जात होता. यात बराच कालावधी जात असल्याने यात बदल करून जिल्हा विदुयत निरीक्षक यांना यासाठी आवश्यक असणारे अधिकार नुकतेच प्रदान करण्यात आल्याने अर्ज केलेल्या स्थानिक उमेदवारांना हा परवाना लवकर मिळणार आहे.

विदुयत शाखेतील पदविकाधारक आणि पदवीधारक बेरोजगार अभियंत्यांसाठी महावितरणने आपल्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक सुरु केली असून त्या ठिकाणी उमेदवार माहिती भरून परवान्यासाठी अर्ज करू शकतात यासाठी त्यांना महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी, विनोद सोनकुसरे यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *