- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर : डिसेंबर पर्यंत कामठी आणि सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर प्रवासी सेवा

महा मेट्रोच्या स्थापनेला 6 वर्ष पूर्ण

नागपूर : 21 ऑगस्ट 2014 रोजी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे भूमिपूजन व 2015 पासून नागपूर शहरात मेट्रो रेल प्रकल्पाच्या निर्माण कार्याला सुरुवात झाली. 2015 ते 2021 – हा सहा वर्षाचा प्रवास महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पासाठी यशाचे अनेक शिखर गाठणारे ठरले, या वर्षात नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दोन मार्गिका ऑरेंज आणि अ‍ॅक्वा लाईनचे उदघाटन झाले आणि नागपूर मेट्रोची प्रवासी सेवा सुरु करण्यात आली. डिसेंबर 2021 सेंट्रल एव्हेन्यू,आणि कामठी मार्गावर प्रवासी सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस आहे.

सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन आणि सिताबर्डी ते लोकमान्य नगर मार्गिकेवर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत नवीन कीर्तिमान स्थापित करीत आहे. नागपूर मेट्रोच्या कार्याचा गौरव इतर राज्यातील शहरांमध्ये देखील होत आहे. या व्यतिरिक्त नुकतेच केंद्र सरकारने सादर केलेल्या बजेट मध्ये नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज – 2 चा समावेश केला आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा फेज – 2 हा 43.8 कि.मी लांबीचा असून यामध्ये 32 मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. उल्लेखनीय आहे कि, नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज 2 करता तसेच नाशिक मेट्रो रेल प्रकल्पाकरता भरीव तरतूद केली आहे.नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे निर्माण कार्य करतांना नागरिकांच्या सहकार्यामुळे कार्य जलद गतीने होण्यास मदत झाली. नागपूर मेट्रो ही निश्चितच नागपूरकरांची मेट्रो अशी माझी मेट्रो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *