- Breaking News, विदर्भ

मुंबई : या सरकारला चर्चाच होऊ द्यायची नाही त्यामुळे केवळ 2 दिवसांचे अधिवेशन : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई : आज शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत अनेक ठिकाणी कवडीची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. कोरोनाच्या संपूर्ण काळाचा पंचनामा करण्याची गरज आहे. या काळातही भ्रष्टाचार हा संताप आणणारा. ४८ हजार मृत्यू राज्यात झाले आहेत. सरकार स्वतः स्थिती हाताळणीचा दावा का करते, हे अनाकलनीय आहे. महिला अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. अश्या विविध विषयांवर सरकारला चर्चा करायची नाही म्हणून हे अधिवेशन दोन दिवस ठेवून अधिवेशन गुडलं जात आहे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

या सरकारला चर्चाच होऊ द्यायची नाही. त्यामुळे केवळ 2 दिवसांचे अधिवेशन घेऊन राज्यातील गंभीर प्रश्न, आज शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत अनेक ठिकाणी कवडीची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही, कोरोनाच्या संपूर्ण काळाचा पंचनामा करण्याची गरज आहे. ते राज्य विधिमंडळाचे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, आशीष शेलार, महादेव जानकर, विनायक मेटे, अविनाश महातेकरजी आणि अन्य नेते उपस्थित होते.

शक्ती कायद्यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित. मराठा आरक्षणावर सरकार अपयशी. सरकारच्या दुर्लक्षामुळे सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळणे हे दुर्दैवी. आज ओबीसी आरक्षण संदर्भात मंत्रीच प्रश्न उपस्थित करीत आहेत. समाजामध्ये भयाचे वातावरण, ते तत्काळ दूर करणे गरजेचे. राज्यातील सामाजिक घडी विस्कटता कामा नये. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याबाबत सरकारने निःसंदिग्ध ग्वाही देणे गरजेचे. 

मुंबईचे प्रकल्प सरकारने वारावर सोडले. राज्यात अघोषित आणिबाणी या सरकारने लावली आहे. सरकारला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. सत्ता डोक्यात गेली की असे होते. संसदेत कृषि विधेयकावर चर्चा झाली नाही असे आरोप करतात. पण ते खरे नाही. जेव्हा चर्चेचा आग्रह धरला गेला, तेव्हा गोंधळ घातला गेला. मुख्यमंत्र्यांनी जेथे भेटी दिल्या, त्या सर्व आमच्या काळात सुरू झालेल्या योजना. भाजपाला सरकार पाडण्यात रस नाही. ते स्वत:च्या अंतर्विरोधानेच पडेल. जेथे जेथे समाजाचे दुःख आणि दैनाहदिसेल, तेथे आंदोलन करूच. त्यांनी खुशाल तक्रारी कराव्या. कोरोनाच्या काळात भ्रष्टाचार ज्यांनी कुणी केला असेल, त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. असेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *