नागपूर समाचार : महामानव, भारतरत्न,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या, जयंती निमित्त बजरंगनगर मित्र परिवारा तर्फे मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहून उत्साहात जयंती साजरी केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी केक कापून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत सामाजिक समता, बंधुता आणि संविधान मूल्यांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी नगरसेविका सौ. साहनवी रवि तुरडकर, तसेच (शिंदे गट) शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते प्रेम (हितेश) मुंदाफळे, प्रमोद टाकसांडे, साहिल (सोनू) देठे, स्वप्नील शेंडे, रितिका पोफरे, नारायण देठे, मनोज केळझरे, प्रमोद वाहने, सचिन हाडके, धिरज गाणार, अशोक पाटील, प्रशिल देठे, रुपचंद वासनिक, ज्योती देठे, प्रिया मुंदाफळे, पिंकेश्वरी गाणार, वंदना पोफरे, अंजली पाणबुडे, देविका गजभिये, शिल्पा केळझरे, यशोधरा हाडके, पल्लवी शेंडे, करुणा गजभिये, रेखा मेश्राम, भावना गणवीर, आदींची उपस्थिती होती कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक, युवक व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरण पाहायला मिळाले. यावेळी सर्वांनी एकत्र येऊन बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा आणि समाजात समतेचा संदेश पोहोचविण्याचा संकल्प केला.




