- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : एम.ए.के. आझाद आणि जी.एम बनातवाला शाळेतील ‘स्टेम लॅब’चे महापौरांच्या हस्ते उदघाटन

एम.ए.के. आझाद आणि जी.एम बनातवाला शाळेतील ‘स्टेम लॅब’चे महापौरांच्या हस्ते उदघाटन

नागपूर समाचार : मनपाच्या शाळेतील शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नागपूर महानगरपालिका सतत प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात प्रयोगातून विज्ञान शिकता यावे यासाठी आमदार प्रवीण दटके यांच्या आमदार निधीतून मनपाच्या ७ शाळांमध्ये ‘अद्ययावत स्टेम लॅब’ची निर्मिती करण्यात आलेली आहे. सोमवारी (ता.३१) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते एम.ए.के. आझाद उर्दू माध्य. शाळा आणि जी.एम बनातवाला इंग्रजी माध्य. शाळेतील ‘अद्ययावत स्टेम लॅब’चे उदघाटन करण्यात आले.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, नगरसेवक मोहम्मद इब्राहिम तौफिक अहमद, मनोज सांगोळ, माजी नगरसेवक अस्लमभाई, मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सुके, पॉथ फाइंडर संस्थेचे प्रमुख धनंजय बालपांडे, पॉथ फाइंडर संस्थेचे राजेश मेश्राम, छाया पोटभरे, निकिता तपासे, तसेच दोनही शाळेचे मुख्याधापक आणि शिक्षक उपस्थित होते.

महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, विज्ञानातील रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणितातील घटक विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने प्रयोगाच्या माध्यमातून शिकता यावे यासाठी मनपातर्फे साकारण्यात आलेली ‘अद्ययावत स्टेम लॅब’ची निर्मिती करण्यात आली आहे. पॉथ फाइंडर संस्था पुढील तीन वर्ष विज्ञान विषयाच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मागर्दर्शन करणार आहे. लॅब मधील प्रयोग कसे करावे, उपकरणांचा उपयोग कशा पद्दतीने करावा याबद्दल सर्व माहिती संस्थे वतीने शिक्षकांना देण्यात येणार आहे. यामध्ये २०० पेक्षा अधिक प्रयोग करता येणार आहे. यामधून पाठ्यक्रमातील प्रत्येक घटक समजून घेता येणार आहे, अशा पद्धतीने स्टेम लॅबचे नियोजन करण्यात आले आहे. आधुनिक भारतात अत्याधुनिक शिक्षण देण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.

‘अद्ययावत स्टेम लॅब’च्या माध्यमातून मनपाचे विद्यार्थी प्रत्येक विषय प्रयोगाच्या माध्यमातून शिकू शकणार आहेत. यामुळे विद्यार्थी नैसर्गिक पद्धतीने आपल्या बुद्धीला विकसित करून खेळातून विज्ञानाला आत्मसात करू शकणार आहेत, असे महापौर यावेळी म्हणाले. स्टेम लॅबच्या निर्मितीसाठी नियमित पाठपुरावा करण्यासाठी महापौरांनी शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे आणि शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांचे अभिनंदन केले. तसेच आमदार प्रवीण दटके यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी पॉथ फाइंडर संस्थेचे प्रमुख धनंजय बालपांडे यांनी प्रयोगशाळेविषयी आणि विविध प्रयोगांविषयी महापौरांना माहिती दिली व काही प्रात्यक्षिकही करून दाखविले. तसेच पुढील तीन वर्ष पॉथ फाइंडर संस्था लॅब निर्मित शाळेतील विज्ञान विषयाच्या शिक्षकांना स्टेम लॅब मधील विविध प्रयोगांविषयी मार्गदर्शन करणार आहे. या तीन वर्षाच्या काळात शिक्षक पारंगत होऊन विद्यार्थ्यांना प्रत्येक घटक सहजरित्या समजावून सांगू शकतील.

लॅब तयार करण्यात आलेल्या शाळा

१. लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळा

२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी माध्यमिक शाळा

३. एम.ए.के. आझाद उर्दू माध्यमिक शाळा

४. दुर्गानगर मराठी माध्यमिक शाळा

५. जी.एम. बनातवाला इंग्रजी माध्यमिक शाळा

६. राममनोहर लोहिया हिंदी माध्यमिक शाळा

७. संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *