प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेषांक
- तिरंगा फडकता आकाशी,
- नव्या उन्हांची होते सुरवात,
- प्रजासत्ताक दिनाच्या सुवासी,
- हृदय भरून येते गाणं गात।
- संविधानाचा पवित्र ग्रंथ,
- सर्वांना समान अधिकार देणारा,
- लोकशाहीचा हा अमूल्य संत,
- देशाचा आदर्श घोष करणारा।
- बलिदानाची स्मृती जपून,
- एकता – अखंडतेचे गाणे गाऊ,
- नव्या संकल्पांचे पूल बांधून,
- भवितव्याच्या पथावर निघू।
- स्वातंत्र्य, समता, बंधुभाव,
- होत राहो हेच तीन आदर्श,
- प्रजासत्ताकाचा हा महिमावंत गौरव,
- राष्ट्र पितांचा हा अमर विश्वास।
- प्रत्येक नागरिकाच्या मनात,
- जागो – जागो देश भक्तीची ज्योत,
- प्रजासत्ताक दिनाच्या या शुभ क्षणात,
- सर्वांना कोटी – कोटी शुभेच्छा।
सौ. सुनंदा पुरी




