नागपुर समाचार : “रुग्ण सेवा ईश्वर सेवा” आज दिव्यांग बंधू आणि जेष्ठ नागरिकांना लागणारे साहित्य वाटप माँ तुजाभवानी देवस्थान मनीष नगर नागपूर येथील आरोग्य शिबिर मध्ये आलेले गरजूंना शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष तर्फे आणि सी आर सी संस्था व नवीन बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था द्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
या साहित्य वाटप कार्यक्रमाला माननीय.श्री. एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे वैद्यकीय मदत कक्षाचे मुंबई मंत्रालय ओ एस डी माननीय.श्री. मंगेश जी चिवटे साहेब कार्यक्रमाची सुरुवात थेट मुंबई हून व्हिडिओ कॉल द्वारे आरोग्य संबंधित विविध रुग्ण सेवेची माहिती इतर योजनेची माहिती व्हिडिओ कॉल द्वारे दिली कार्यक्रमाला आलेले सर्व दिव्यांग बंधू आणि ज्येष्ठ नागरिकांना व साहित्य वाटप माननीय.श्री. आशिष जी जयस्वाल साहेब महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

तसेच प्रमुख्याने उपस्थित श्री प्रफुल जी शिंदे, श्री आकाश जी यादव, श्रीमती एल अनुरूप, कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पूर्व विदर्भ प्रमुख प्रवीण लता बालमुकुंद शर्मा, नागपूर शहर जिल्हाप्रमुख सचिन शर्मा, नागपूर शहर महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रिती ताई भोयर, नागपूर उपजिल्हा प्रमुख राहुल चांडक, शहर प्रमुख जगदीश गुप्ता, महिला आघाडी नागपूर शहर प्रमुख उषा ताई धुर्वे, वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख विनोद बाभुळकर, कामठी विधानसभा प्रमुख संतोष समुद्रे, समाज सेवक योगिता वनवे, वैद्यकीय मदत कक्षाचे आदी पदाधिकारी व आरोग्य दूत कार्यक्रमाला सफल बनवण्याकरिता उपस्थित होते.




