- Breaking News, नागपुर समाचार

लोकसभा चुनाव 2024 : नागपुरात ३ वाजतापर्यंत ३८.४३ टक्के तर रामटेकमध्ये ४०.१० टक्के मतदान!

लोकसभा चुनाव 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७ वाजतापासून सुरुवात झाली आहे. २१ राज्यांमधील १०२ मतदारसंघात मतदान होत आहे.

त्यामध्ये महाराष्ट्रातील ५ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. नागपुरात दुपारी ३ वाजतपर्यंत ३८.४३ टक्के मतदान पार पडले. तर तर रामटेकमध्ये ४०.१० टक्के मतदान पार पडले.

दरम्यान संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे अशी थेट लढत होत आहे. तर जिल्ह्यातील दुसऱ्या म्हणजेच रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे विरुद्ध काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वे असा सामना होत आहे.

लोकसभा मतदारसंघ निहाय दुपारी ३ वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी-

भंडारा-गोंदिया : ४५. ८८

चंद्रपूर : ४३. ४८

गडचिरोली-चिमुर : ५५.७९

नागपूर : ३८. ४३

रामटेक : ४०. १०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *